Your Own Digital Platform

पत्रकारांनी बाळशास्त्रींचे विचार जपावेत: बापूराव जगताप

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन प्रसंगी निलेश सोनवलकर, सुधीर अहिवळे, विशाल शहा, प्रसन्न रुद्रभटे, युवराज पवार, बापुराव जगताप, अरुण खरात.स्थैर्य, फलटण : पत्रकारांचे कार्य समाजासाठी दीपस्तंभाप्रमाणे असून पत्रकारिता करीत असताना बाळशास्त्रींचे पत्रकारितेतील हेतू व विचार जपण्यासाठी सर्वांनी सदैव कटीबद्ध रहावे, असे मत फलटण तालुका वृत्तपत्र संपादक संघाचे उपाध्यक्ष बापुराव जगताप यांनी व्यक्त केले.

फलटण तालुका वृत्तपत्र संपादक संघाच्यावतीने 6 जानेवारी राज्यस्तरीय पत्रकार दिनाच्यानिमित्ताने येथील महात्मा एज्युकेशन सोसायटी संचलित आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयात बाळशास्त्रींच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यावेळी जगताप बोलत होते.
समाजात जनजागृती करण्याचे काम पूर्वीपासूनच पत्रकार करत आहेत. मात्र समाजासाठी कार्य करत असताना पत्रकारांच्यात एकजूट असणे आवश्यक आहे. यासाठी वृत्तपत्र संपादक संघाच्या मार्फत आपण प्रयत्न करणार असल्याचेही जगताप यांनी सांगीतले.

यावेळी फलटण तालुका वृत्तपत्र संपादक संघाचे अध्यक्ष विशाल शहा, सुधीर अहिवळे, युवराज पवार, प्रसन्न रुद्रभटे, निलेश सोनवलकर व संदीप कांबळे उपस्थित होते.

प्रास्ताविक निलेश सोनवलकर यांनी केले तर आभार विशाल शहा यांनी मानले. विद्यालयाच्यावतीने सर्व संपादकांचे स्वागत उपशिक्षक अरुण खरात यांनी केले.