Your Own Digital Platform

डान्स वर्कशॉप ची सातारकरांना मोठी उत्सुकताकोरिओग्राफर गणेश आचार्यांचे मिळणार मार्गदर्शन, नाव नोंदणी अंतिम टप्प्यात

स्थैर्य, सातारा : येथील पंकज चव्हाण डान्स अकॅडमी तर्फे २० ते ३० जानेवारी दरम्यान आयोजित डान्स वर्कशॉप बाबत सातारकरांचा सह संपूर्ण राज्यात सर्वांनाच मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच होत असलेल्या बॉलीवूड मधील नामवंत कोरिओग्राफरमार्गदर्शनाखाली या वर्कशॉप ची नोंदणी अंतिम टप्प्यात आली असून सर्व वयोगटातील नृत्य प्रशिक्षणार्थींनी ही सुवर्ण संधी असल्याची जाणकारांच्या तून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

साताऱ्यातील पंकज चव्हाण डान्स अकॅडमी तर्फे सातत्याने नृत्य विषयक विविध उपक्रम घेण्यात येतात सातार यासारख्या ग्रामीण व शहरी संस्कृतीचे संमिश्र वातावरण असलेल्या ऐतिहासिक शहरात नृत्य क्षेत्रात करिअर करण्यास इच्छुक असलेल्या व कृत्याबाबत अभिरुची जपणार्‍या कलाप्रेमींना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच अकॅडमी चे संस्थापक पंकज चव्हाण प्रयत्नशील असतात पंकज चव्हाण यांच्या माध्यमातून अनेक दिग्गज नृत्यदिग्दर्शक साताऱ्यात आले आहेत. त्यामध्ये फुलवा खामकर, सरोज खान, सिद्धेश पै, शक्ती मोहन, रोहन रोकडे, आशिष पाटील, धर्मेश, राघव आदींचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. बालचमू सह विविध वयोगटातील व्यक्तींना नृत्य प्रशिक्षण देणे, पारंगत करणे व्यासपीठ देण्यासाठी अकॅडमी सक्रिय असते. याशिवाय मा. खा. श्री. छ.उदयनराजे भोसले यांच्या आशीर्वादाने सातारा गौरव पुरस्कारासह विविध उपक्रमही राबविण्यात येतात. दरम्यान बॉलीवूड मधील अनेक सुपरहिट सिनेमांमधील गाण्याच्या लोकप्रियतेत भर घालणारे कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 20 ते 30 जानेवारी दरम्यान सलग दहा दिवस नृत्य प्रशिक्षणाची अत्यंत दुर्मिळ संधी सातार यासह संपूर्ण राज्यातील नृत्य प्रेमींसाठी उपलब्ध होत आहे.

वय वर्ष साडेसात ते साठी पर्यंतच्या विविध वयोगटातील मुले-मुली महिला ज्येष्ठ आदींसाठी स्वतंत्र सहा बॅचेस तसेच महिला ग्रुप नोंदणीसाठी सैनिक पाल्यांसाठी प्रवेश शुल्कात सवलत,परराज्यातून येणाऱ्या प्रशिक्षणार्थींना निवास व भोजनाची माफक दरात सोय केली जाणार आहे. कार्यशाळेच्या अखेरच्या दिवशी कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्यासह सहभागी विद्यार्थ्यांच्या नृत्याविष्कार आची खुली सादरीकरण होणार आहे. तसेच गणेश आचार्य यांच्या हस्ते शिबिरार्थी तील प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.

कोरिओग्राफर गणेश आचार्य चिकणी चमेली, रामजी की चाल देखो, हवन करेंगे, बाला ओ बाला तसेच नुकताच प्रदर्शित झालेल्या तानाजी या चित्रपटातील शंकरा या लोकप्रिय गीतांवरील नृत्य दिग्दर्शन केले आहे. मन प्रसन्न ठेवणे आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी कृती उपयुक्त ठरते. तसेच साताऱ्यातील ऐतिहासिक भूमीत व्यक्ती प्रशिक्षणासाठी येणे ही फार मोठी एक्साइटमेंट असल्याचे कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी म्हटले असून कार्यशाळेतील सहभागासाठी 97 64 40 64 64 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन पंकज चव्हाण यांनी केले आहे.