Your Own Digital Platform

औंधला आजपासून राज्यस्तरीय संगित भजन स्पर्धांचे आयोजन


श्यामपुरी महाराज यांची माहिती : बुधवार दि. 15 ते शुक्रवार दि.17 अखेर होणार स्पर्धा.

स्थैर्य, औंध : औंध (ता.खटाव) येथे ब्रम्हलीन हिरापूरी महाराज यांच्या 49 व्या पुण्यस्मरणानिमित्त आजपासून राज्यस्तरीय संगीत भजन स्पर्धांचे आयोजन केल्याची माहिती श्यामपुरी महाराज यांनी दिली.
या स्पर्धेचे यंदा 20 वे वर्ष आहे. बुधवारी सकाळी दहा वाजता ढेकणे शास्त्री (रेठरे हरणाक्ष) यांच्या हस्ते हिरापूरी महाराजांच्या पादुकांना रूद्रभिषेक व मंत्रपुष्पांजलीचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी पुसेगावच्या सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, मठाधिपती रामगिरी महाराज (चिंचणी अंबक), वेदांताचार्य शिवानंद भारती (शिवधाम, अंभेरी), यमाई देवस्थानच्या चिफ ट्रस्टी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, राजवैभव प्रतिष्ठानचे दत्तात्रय जगदाळे. मठाधिपती स्वानंद महाराज (पद्मावती) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. गुरूवारी दि.16 रोजी सकाळी संगीत भजन स्पर्धांचा शुभारंभ होणार आहे. खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मोहनराव कदम, आमदार महेश शिंदे, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, हरणाई सुतगिरणीचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, सरपंच सौ. सोनाली मिठारी, उपसरपंच दिपक नलवडे, शिवसेना नेते लक्ष्मण शिंदे (ठाणे) आदी मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचा शुभारंभ होणार आहेत. यावेळी पुरूष गटाच्या भजन स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी  11 हजार रूपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकासाठी 7 हजार रूपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तृतीय क्रमांकासाठी 5 हजार रूपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. चतुर्थ क्रमांकासाठी 3 हजार रूपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे.

शुक्रवारी दि.17 रोजी महिला गटांच्या भजन स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी यांचेकडून 11 हजार रूपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकासाठी 7 हजार रूपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. तृतीय क्रमांकासाठी 5 हजार रूपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. चतुर्थ क्रमांकासाठी 3 हजार रूपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे.

याच दिवशी स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ होणार आहे. यावेळी ज्योती गॅस एजन्सीचे रमेश चव्हाण, बाजार समितीचे माजी उपसभापती ज्ञानेश्वर शिंदे, सिद्‌धनाथ पतसंस्थेचे संचालक सुरेशराव जाधव, औंधच्या राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. श्रीकांत भंडारे, शाखा अभियंता कृष्णात फडतरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अधिक माहितीसाठी श्यामपुरी महाराज यांचेशी संपर्क साधावा.