Your Own Digital Platform

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पदभार स्वीकारला




स्थैर्य, कराड :
 महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी बुधवारी आपल्या मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. कराड उत्तर विधानसभा मतदार संघातून आमदारकीचा रौप्यमहोत्सव साजरा करणारे बाळासाहेब पाटील यांना सहकार व पणनमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खा. शरद पवार यांनी संधी दिली आहे. 30 डिसेंबर रोजी पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती.

सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी पदभार स्वीकारला यावेळी आ.भारत भालके, आ.संग्राम थोपटे, आदर्श सरपंच शहाजी क्षीरसार, सेवानिवृत उपायुक्त तानाजी साळुखे, माजी सहकार न्यायाधिश अशोक पवार, आश्रमशाळा संचालक किरण शिंदे उपस्थित होते.

खा. शरद पवार यांच्या विचारांची पाठराखण करीत, स्व. यशवंतराव चव्हाण व स्व.पी.डी. पाटीलसाहेब यांच्या विचारानुसार सहकार, सामाजिक, राजकीय क्षेत्रात वाटचाल करून काम करीत आहोत. याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यस्तरावर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली असे सांगून सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पदभार स्वीकारला. राज्यातील सहकार चळवळ अधिक सक्षम करण्याचा आपला प्रयत्न राहील. सहकार क्षेत्रातील तज्ञांची विविध प्रसंगी चर्चा केली जाईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका राहिली आहे. राज्याच्या सहकार व पणनमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज्यातील ऊस उत्पादक आणि शेतकरी बांधवांना न्याय देण्याची प्राथमिकता असेल असेही सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.