Your Own Digital Platform

राजाचे कुर्ले प्राथमिक शाळेच्या प्रांगणात भरलेल्या विदयार्थ्यांच्या बालबाजारास मोठा प्रतिसाद


स्थैर्य, पुसेसावळी: खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले प्राथमिक शाळेच्या प्रांगणात भरलेल्या विदयार्थ्यांच्या बालबाजारास मोठा प्रतिसाद मिळाला.या बाजारात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल झाली.संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या बाजारात ग्रामस्थांना गावातच ताजा भाजीपाला मिळाल्याने ग्रामस्थांत समाधानाचे वातावरण होते.

शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानाचे धडे मिळाले.या बाल बाजारास सरपंच समरजित राजेभोसले, ग्रामपंचायत सदस्य,माजी सरपंच अनिल माने,हिंदूराव माने,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष माने, उपाध्यक्ष हेमलता माने, शाळा स्थापन समितीचे सदस्य,सोसायटीचे अध्यक्ष व संचालक,पालक यांची उपस्थिती होती. मुख्याध्यापिका मनिषा आपटे, मीनाक्षी माने ,संदीप घार्गे, दिपाली मांडवगडे यांनी या उपक्रमाचे नियोजन केले होते. बाजारात सर्व पालेभाज्या व फळभाज्या,विविध प्रकारचे खाद्यपदार्थ विद्यार्थ्यांनी विक्रीस मांडल्याने या बाजारास एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले होते.
फोटो- राजाचे कुर्ले प्राथमिक शाळेतील बाजाराला ग्रामस्थांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.