Your Own Digital Platform

मुलींचा जन्मदर वाढावा यासाठीच्या जाणीव जागृतीसाठी शासनाच्या प्रत्येक विभागाने सक्रीय काम करावे : जिल्हाधिकारी श्वेता सिंघलसातारा  : मुलींचा जन्मदर वाढावा यासाठीच्या जाणीव जागृतीसाठी प्रत्येक संबंधित विभागाने प्रयत्न केले पाहिजे. यासाठी जिल्हास्तरावर तसेच ग्रामपातळीवर कार्यक्रमांचे आयोजन करुन मुलींच्या जन्मदर वाढण्याबाबत जनजागृती करा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत आढावा बैठक जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे, डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी समाजामध्ये वातावरण निर्मिती करावी, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल पुढे म्हणाल्या, आई-वडील वृद्ध झाल्या मुलेच संभाळतात हा समज समाजातून दूर करा. आजच्या मुलीही आपल्या आई-वडीलांचा सांभाळ करता अशी अनेक उदाहरणे आहेत.

मुलींच्या जन्मदारासाठी शहरी तसेच ग्रामीण भागात जनजागृती करा. जन्मदराचा अधिकृत सर्व्हे करुन कोणत्या भागात मुलींचा जन्मदर कमी आहे, त्या ठिकाणी जनजागृतीसाठी अधिकाधिक भर द्यावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी या बैठकीत केल्या.