Your Own Digital Platform

आजचा दिवस


शके १९४१, विकारीनाम संवत्सर, गुरुवार, दि. ९ जानेवारी २०२०, पौष शुक्ल चतुर्दशी, चंद्र - मिथुन राशीत, नक्षत्र- मृग दुपारी ३ वा. ३८ मि. पर्यंत नंतर आर्द्रा, सुर्योदय- सकाळी ७ वा. १५ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. १५ मि.
 
नमस्कार आज चंद्र मिथुन राशीत रहात आहे. आजचा दिवस चांगला दिवस आहे. आज गुरु - चंद्र प्रतियोग होत आहे. आज आजचा दिवस मेष, वृषभ, मिथुन, सिंह, कन्या, तुला, धनु, कुंभ व मीन या राशिंना अनुकूल तर कर्क, वृश्चिक व मकर या राशिंना प्रतिकूल जाईल.
 
मेष-               उत्साही रहाल. उमेद वाढेल. छोटे प्रवास होतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
 
वृषभ-          आर्थिक कामात सुयश लाभेल. मनोबल उत्तम राहील. प्रवासाचे योग येतील. कौटुंबिक सौख्य                          लाभेल.
 
मिथुन-        कामाचा ताण कमी होईल. तुमचा उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
 
कर्क-        प्रवास नकोत. मनोबल कमी राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता राहील.
 
सिंह-       आर्थिक लाभ होतील. मनोबल उत्तम राहील. महत्त्वाचे निर्णय घ्याल. 

कन्या-      आरोग्य उत्तम राहील. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. 

तुला-      उत्साह वाढेल. आरोग्य उत्तम राहील. मनोबा वाढेल. प्रवास होतील.
 
वृश्चिक-   खर्च होतील. वाहने सावकाश चालवावित. अतिउत्साहिपणा टाळावा. मनोबल कमी राहील.
 
धनु-       प्रवास होतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल.
 
मकर-    विनाकारण खर्च संभवतात. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रवासात व वाहने चालविताना काळजी                 घ्यावी.
 
कुंभ-      प्रियजन भेटतील. आर्थिकलाभ संभवतात. नवीन परिचय होतील.
 
मीन-    मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्य सुधारेल. प्रवास होतील. मनोबल वाढेल.
 
आज दुपारी १.३० ते ३ या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
 
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, सातारा- ९८२२३०३०५४