Your Own Digital Platform

योग विद्याधाम तर्फे रथसप्तमीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य सुर्यनमस्कार स्पर्धा


स्थैर्य, सातारा : योग विद्याधाम सातारा संस्थेच्या वतीने रथसप्तमीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य सुर्यनमस्कार स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 9 ते 11 अ वयोगटासाठी व सकाळी 11 ते 1 या वेळेत ब वयोगटासाठी कोटेश्‍वर मैदानासमोरील कला वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात सातारा येथे संपन्न होणार आहेत. ही स्पर्धा मुले व मुली यांच्या स्वतंत्र गटात असून अ वयोगटात इयत्ता 5 वी ते 7 वी व ब वयोगटात इयत्त 8 वी ते 10 वीच्या मूला मुलींना सहभाग घेता येईल. इच्छुक स्पर्धकंासाठी नाव नोंदणीची अंतिम मुदत 30 जानेवारी 2020 अशी राहील या स्पर्धेसाठी स्पर्धाकमिटीच्या सौ. सुजात पाटील व सौ. अनुराधा इंगळे यांचे मार्गदर्शन राहील.
 
स्पर्धेतील प्रत्येक वयोगटातील विजेत्यांसाठी प्रथम क्रमांक रुपये 1000 व स्मृतीचिन्ह, व्दितीय क्रमांक 700 रु व स्मृती चिन्ह, तृतीय क्रमांक रुपये 500 रोख व स्मृती चिन्ह दिले जाईल. तसेच दोन्ही वयोगटातील प्रत्येकी दोन स्पर्धकांना उत्सेजनार्थ बक्षिसे दिले जातील या शिवाय प्रत्येक स्पर्धकाला स्पर्धा सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. या स्पर्धेत पंचाचा निर्णय अंतिम राहिल. या स्पर्धेत प्रत्येक स्पर्धकाला 10 अंकात सुर्यनमस्कार घालणे बंधनकारक आहे. स्पर्धेसाठी येताना आधारकार्डची झेरॉक्स आणावी. स्पर्धेसाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून नोंदणी शुल्क 100 रुपये इतके आहे. प्रत्येक स्पर्धकाने येताना स्वताची योगा मॅट अथवा सतरंजी आणावी तसेच सोबत खाउचा डबा व पाण्याची बाटली सोबत आणावी स्पर्धकांनी स्पर्धवेळी पोशाख सैलसर घालावा. औधकर पध्दतीचे एकूण 51 सुर्यनमस्कार घालावेत तसेच कमीत कमी कालावधीत आदर्श स्थितीप्रमाणे सुर्यनमस्कार घालणे अपेक्षित आहे. 

नाव नोंदणीसाठी सौ. शैलजा ठोके 9823946465, सौ. शबाना शेख 9762881515, सौ. सुजाता पाटील 8806511777, सौ. निलिमा खांडके 9021362463, डॉ. सौ. विजया कदम 9823296296, डॉ. प्रदिप घाडगे 9850323538 यांच्याशी संपर्क साधन्याचे अवाहन संयोजकांनी केले आहे.