Your Own Digital Platform

आयडियल किडस स्कुलचा वार्षिक स्नेहसंमेलन "महाराष्ट्र माझा" सोहळा दिमाखात संपन्न.


स्थैर्य, सातारा : फलटण येथील नामांकित आयडियल किडस इंटरनँशनल स्कुलच्या "महाराष्ट्र माझा" हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा दिमाखदार सोहळा अतिशय रुबाबदारपणे आणि दिमाखदार पणे आयोजित करण्यात आला होता. दोन सत्रात पार पडलेल्या या सोहळ्यात प्लेग्रुप ते इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलाविष्काराने उपस्थित सर्वांनी दाद मिळवली. आयडियल परिवार, आपल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना याप्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करुन द्यायला नेहमी तत्पर असते याची प्रचिती या कार्यक्रमामुळे पुन्हा अधोरेखित झाली.
 
हा शानदार सोहळ्याच्या पहिल्या सत्रात, आयडियल विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी तसेच इंग्रजी गाण्यांच्यावर आपले पदलालित्य दाखविले. आपल्या महाराष्ट्रातील लोककलांचा मिलाफ याठिकाणी पहावयास मिळाला. तसेच या कार्यक्रमात प्लॅस्टिकच्या अतिरेकी वापराचा दुष्परिणाम यावर सिनिअर केजी मधील विद्यार्थ्यांचा नाट्याविष्कार अफलातून होता. वयवर्षे तीन ते पाच या वयोगटातील लहान मुलांना सामाजिक बांधिलकी समजावून ती अशा कार्यक्रमातून दाखवून देणे खरंच कौतुकास्पद आहे. या विद्यार्थ्यांचा उत्साह अमाप होता... आणि आपल्या मित्रांना टाळ्या वाजवून प्रोत्साहन देण्यात ही चिमुकले आयडियल्स कमी नव्हते.
 
या कार्यक्रमातील दुसऱ्या सत्रामध्ये इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे परफॉरमन्स पहावयास मिळाले. या कार्यक्रमाची सुरवात शिवआराधनेने झाली. यामध्ये महाराष्ट्र माझा या थीमनुसार विद्यार्थ्यांनी जय महाराष्ट्र गीत, जोगवा गीत, कोळीगीत, शेतकरी गीत, दहीहंडी, पोतराज यासारख्या मराठमोळ्या गाण्यांच्यावर डान्स करुन आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीचे कलात्मक प्रदर्शन केले. तसेच जुन्यानव्या हिंदी गाण्यांच्या अप्रतिम मिलाफाने व त्यावरच्या डान्सने उपस्थितीतांना ही ठेका धरायला उदुक्त केले. या सर्वावर कढी म्हणजे आयडियल किडस इंटरनँशनल स्कुलने आपल्या महाराष्ट्र धर्माला अनुसरून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या सोहळ्याचे अतिशय सुंदर नियोजन केलेले होते... या राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित सर्वांनी उभे राहून मानवंदना दिली.

 
आयडियल स्कूलने आपल्या लौकिकाला साजेसे असे या देखण्या स्नेहसंमेलनाचे योग्य नियोजन केलेले होते. इंग्रजी माध्यमाची शाळा असूनही आपल्या महाराष्ट्र भुमीचे कौतुक, आयडियल समुहाने स्टेजवरील सुंदर सजावट आणि आयडियल विद्यार्थ्यांच्या लोकन्रुत्याव्दारे अतिशय सुबक अन सुंदर केले होते.
 
या कार्यक्रमासाठी कोऑर्डिनेशन व प्रायमरी शिक्षकांचे ग्रुप लीडर म्हणून स्नेहल कदम व त्यांचे सहकारी तसेच प्रि- प्रायमरी सेक्शन च्या टीम लीडर अमृता जवळेकर व सारिका जगताप तसेच त्यांचे टीममेटस यांनी विशेष मेहनत घेतली तसेच कोरीओग्राफर सारिका जगताप, ईशा, साशा, प्राजक्ता देशपांडे आणि प्रशांत भोसले सर यांनी मुलांच्याकडून डान्स उत्तमरित्या बसवून घेतले. 

या कार्यक्रमासाठी स्टेज डेकोरेशन सेट, साउंड, लाईट गोल्डन इव्हेंट मँनेजमेंटचे श्री. रवी ढेंबरे सर, श्री. मतीन तांबोळी यांनी काम पाहिले. फोटोग्राफी अन विडिओची धुरा श्री. अनिल साळुंखे सर यांनी पाहिले. 

हा सोहळा आपल्या सर्वांना पाहण्यासाठी खरी मेहनत ही संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा आदरणीय सौ. वैशाली शिंदे मँम आणि सचिव निखिल कुदळे यांचे आहेत. आपल्या सर्व आयडियल टीमला एका कुटुंबात सामील करुन त्यांच्यासह इतर सामाजिक व्यक्तिमत्त्वांना प्रेरणादायी असलेल्या सौ. वैशाली शिंदे मँम यांना खूप शुभेच्छा.