Your Own Digital Platform

मला लाभलेले सद्गुरु प. पू. दादा महाराज ग्वाल्हेरकर देशपांडे : श्रीमती सुधाताई पटवर्धन


 स्थैर्य : प. पू. दादा महाराज देशपांडे! आज त्यांचा 35 वा पुण्यतिथी उत्सव. यानिमित्त त्यांच्या शिष्या श्रीमती सुधा योगीराज पटवर्धन यांनी लिहीलेला हा लेख... 

सद्गुरुसारिखा असता पाठीराखा... सुमारे 1979 साल होते. मी माझ्या मुलांना घेउन संध्याकाळी आमच्या घराच्या पायरीवर बसले होते. त्याच वेळेस शेजारच्या दादा महाराजांच्या वाड्यातून श्रीरामनामाचा 13 कोटीचा संकल्प करुन बरीच मंडळी बाहेर पडलेली दिसली. मी म्हटलं आज एवढी माणसं इथं कशी काय? कुतुहल जागं झालं. मी मुलांना घेउन तशीच प. पू. दादा महाराजांच्याकडे गेले. त्यांना नमस्कार केला. ते मला म्हणाले, बस इथे जप कर ‘श्रीराम जयराम जय जय राम’ मला तर माळ कशी धरायची हेही माहित नव्हते. पण ते त्यांनी खरोखर माउलीच्या नात्याने मला शिकवले. झालं, तेव्हापासून मी रोज त्यांच्या दर्शनाला जाउ लागले. रोज एक वेगळाच आत्मिक आनंद लाभत गेला. जर एखादे वेळेस दर्शन राहिलं तर असं काही दिवस घरातून व्हायचं की, आज आपलं काहीतरी चुकलंय! मग लक्षात यायचं की आज आपण दादांच्या दर्शनाला गेलो नाही. म्हणूनच असं झालं, असे करता करता प. पू. दादा महाराज माझ्या जीवनातले श्रद्धास्थान बनले.
 
मी 7/8 वर्षांची असताना प. पू. दादांच्याकडे एक दोन वेळेस कोळकीत जाण्याचा योग आला. पण तेव्हा काय माहित की पुढील आयुष्यात ते मला सद्गुरु म्हणून लाभणार आहेत. त्यांच्या गुरुंचा म्हणजे अण्णा महाराजांचा भंडारा ते कोळकीत करत असत. कोळकीत त्यांनी जवळजवळ 23 वर्षे तपश्चर्या केली. श्री ज्ञानेश्वरी, श्री एकनाथी भागवत, श्री दासबोध, श्री गीता, श्री तुकारामांची गाथा वाचत असत. तेव्हा प. पू. गोविंदकाका उपळेकरही येत असत. असं‘य भक्तगणांच्या आग‘हास्तव ते ब‘ाह्मण आळीतील वास्तूमध्ये रहायला आले. प्रसिद्धी पराङमुख असलेल्या दादांनी स्वत:च्या ज्ञानाचा यासाठी कधीच उपयोग केला नाही. ते चमत्काराच्या विरुद्ध होते. ते कधी कोणाला जास्त वेळ बसवून ठेवत नसत. येणार्‍या प्रत्येक भक्ताला मुखाने नाम व हाताने काम हा मोलाचा सल्ला देत. जीवनात येणारी सुख दु:खे ही भोगूनच संपवायची असतात हे ही ते प्रत्येकाला सांगत असत. हा उपदेश ज्यांनी आचरणात आणला त्यांचे कल्याण झाल्याशिवाय राहिले नाही. आपले वागणे, बोलणे जर सरळ असेल तर कुठल्याही प्रसंगात सद्गुरु पाठीशी राहून भक्ताला सदैव मदत करायला तयार असतातच याचा अनुभव प्रत्येक वेळी आल्याशिवाय रहात नाही. मग त्या अडचणी पारमार्थिक असो अथवा सांसारिक! आपलं कर्म मात्र योग्यच हवं.
 
प. पू. दादा महाराज येईल त्या भक्ताच्या पाया पडत असत. एकदा असंच झालं, तेव्हा मी म्हटले, अहो, दादा! हे काय माझ्या पाया का पडताय? तेव्हा ते म्हणाले, हा नमस्कार तुला नसून तुझ्या आत जो राम आहे ना त्या आत्मारामाला आहे. खरोखरच अगदी मोजकं बोलणं पण किती अर्थ गहन होता. तसच ते नेहमी म्हणायचे, राम धनी त्याला काय कमी? आपण रामाचे अनुसंधान कधी चुकवू नये. प्रत्येक कर्म करताना तो राम पहात आहे याचं भान ठेवा, मग अहंकार राहीलच कसा? असा बहुमोल उपदेश करणारे संत लाभणे ही फारच भाग्याचीच गोष्ट आहे. पूर्व जन्मी देवाशी नातं जोडलं गेलं असेल म्हणूनच या जन्मात दादा महाराजांसारखे सद्गुरु मला लाभले. अशा या भक्तीमार्गावर वाटचाल सुुरु असताना त्यांच्यामुळे कितीतरी सत्पुरुषांची दर्शने झाली. उदा. प. पू. तपस्वी बाबा, भाई कारखानीस, मामा देशपांडे, दत्त महाराज कविश्वर, माधवनाथ इ. व आत्तासुद्धा वर्तमानकाळात प. पू. दीक्षित सर, आण्णा घाणेकर, बालयोगी ओतूरकर महाराज, साईरंग महाराज यांचे सतत मार्गदर्शन लाभत असते. म्हणूनच सद्गुरुंसाठी, रामाच्या भक्तासाठी रामलाच इथे यावं असं वाटलं। यात नवल नाही. त्यांच्या घराचे रुपांतर समाधी मंदिरात होउन समाधी मंदिरात होउन तिथे श्रीराम, लक्ष्मण, सीता, मारुती यांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना 28 नोव्हेंबर 2003 रोजी झाली. ही वास्तू दादांच्या चिरंजीवांनी म्हणजे राजाभैय्यांनी प्रतिष्ठानला मोफत देउ केली. सध्याच्या कलियुगात असा पुत्र लाभणे ही खरंच भाग्याचीच गोष्ट. धन्य ते पिता व धन्य तो पुत्र! राजाभैय्यांची इच्छा एवढीच की वडिलांच्या इच्छेप्रमाणे इथे धार्मिक उत्सव, रामनाम, उपासना व्हावी व दु:खी कष्टी लोकांना इथे आल्यावर आत्मिक आनंद मिळावा.
 
दोन वर्षांपुर्वी रा. वा. जोशी यांनी प. पू. दादा महाराज यांच्यावर काव्यात्मक चरित्र पुस्तिका आनंदाचा कंद या नावाने प्रसिद्ध केली. तसेच 1981 साली ढवळीकर यांनी प. पू. दादांचे चरित्र व भक्तांचे अनुभव हे पुस्तक रुपात प्रसिद्ध केले आहे. आमच्याच आळीतील श्रीमती चंपुताई देशपांडे यांनी प. पू. दादा महाराजांच्या निर्वाणानंतर अगदी एक दोन दिवसातच दादांची आरती केली व या आरतीमध्येही दादांचा उपदेश आला आहे. ही आरती रोज सकाळ संध्याकाळ म्हटली जाते. रात्री आरतीच्या वेळेस आनंदाचा कंद मधील गुरु पाठाचे नमस्कार राम राम व प. पू. गोंदवलेकर महाराजांचे रोजचे प्रवचन वाचले जाते. दर गुरुवारी दासबोधाचे वाचन होते.
 
ह्या पुण्यतिथीच्या निमित्ताने एवढेच म्हणावेसे वाटते की, सद्गुरुंचे निर्वाण झाले तरी हे महात्मे अधिक शक्तीशाली बनतात. भक्तांसाठी त्यांचे कार्य विश्वात्मक परमेश्वराला करावंच लागतं. त्यांचा हा उपक‘म यथाशक्ती व पण नेटाने व डोळसपणे सुरु ठेवणे तसेच हे कार्य सगळ्यांकडून करुन घ्याचा व उत्तरोत्तर भक्तांची सं‘या वाढून आम्हा भक्तांना जी अनुभूती, प्रचिती आली तशी सर्वांना येवो व खरं समाधान, सुख शांती कशात आहे, हे लोकांना कळावं व सर्वांचंच जीवन उध्दरुन टाकावे, एवढीच सद्गुरु दादा महाराजांच्या चरणी विनम‘ प्रार्थना करुन शब्दरुपी पुष्पांजली अर्पण करते.