Your Own Digital Platform

दहिगाव येथे भरला शालेय बालचमूंचा बाजार


स्थैर्य, वाठार स्टेशन : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिगाव येथे शाळेत आयोजीत शालेय बालचमूच्या बाजाराचे उदघाटन सरपंच सौ. कामिनी शाशीकांत चव्हाण, उपसरपंच श्री.तानाजीरामराव चव्हाण व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ, पौर्णिमाताई यूवराज चव्हाण यांच्या हस्ते झाले यावेळी शा.व्य.समितीचे उपाध्यक्ष श्री. अरविंद राजाराम चव्हाण,सर्व सदस्य तसेच पालक व ग्रामस्थांची उपस्थिती होती. मुलांचा उत्साह व व्यवहारकौशल्य पाहून पालकांनी समाधान व्यक्त केले.बाजारात विक्रीसाठी भरपूर प्रमाणात भाज्या,टोमॅटो,काकडी, मेशी, बटाटे,कोदे, मिरची,सर्व फळे (स्ट्रॉबेरी कलिंगड पेरु पपई) तसेच खाऊंचे पदार्थ (वडापाव भेळ, पाणीपुरी) कॉस्मेटिक स्टेशनरी अशा विविध प्रकारच्या वस्तूची मुलांनी विक्री केली.

सदर उपक्रम राबविण्यासाठी सौ.सत्वशिला पवार श्री. विश्वनाथ गायकवाड श्री.नागनाथ बडे या शिक्षकांनी परिश्रम घेतले,