Your Own Digital Platform

नागरिकांना दिवसरात्र भिती आहे ती शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या टोळ्यांचीस्थैर्य, सातारा :  शहरात सध्या सामान्य नागरिकांना दिवसरात्र भिती आहे ती शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या टोळ्यांची. शहरातील प्रमुख रस्त्यांवरही ही मोकाट कुत्री वाहतुकीला अडथळा करत भर रस्त्यात, फुटपाथवर ठाण मांडुन नागरीकांची मोठी कोंडी करत आहेत.
 
शहरात सध्या फिरस्ते खाद्य पदार्थांचे गाडे वाढलेले आहेत तसेच शहरातील राजवाडा परिसरात असलेल्या चौपाटीवरील अनेक व्हेज / नॉनव्हेज खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरील खरकटे पदार्थ तसेच टाकाऊ अन्न उघड्यावर किंवा ओढ्याच्या पात्रात टाकल्यामुळे ही भटकी कुत्री त्यावर यथेच्च ताव मारुन माजू लागली आहेत त्यातच सातारा पालीकेच्या अतिक्रमन विभागाचे कुत्र्यांच्या टोळ्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ही पैदास मोठ्या प्रमाणात वाढून उपद्रवी ठरत आहेत. मंगळवारी दुपारी मोती चौकात तब्बल 13 कुत्र्यांनी ठ्य्यिा मांडल्यांने नागरीकांना तसेच वाहन चालकांना जीव मुठीत धरुन मार्ग शोधावा लागत होता. यावर तातडीने अंमलबजावनी करुन या भटक्या कुत्र्यांचा शहरातून बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत.