Your Own Digital Platform

श्री समर्थ रामदास स्वामींच्या पादुकांचे साताऱ्यात आगमन

समर्थ पादुकांचे स्वागत प्रसंगी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे. एडवोकेट देशपांडे डॉक्टर अच्युत गोडबोले योगेश बुवा पुरोहित व मान्यवर. (फोटो- अतुल देशपांडे सातारा.)


स्थैर्य, सातारा : सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या यावर्षीच्या समर्थ रामदास स्वामी पादुका दौऱ्याचे मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात सातारा येथील पोवईनाका येथे आगमन झाले. सातारा उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या पादुकांचा पूजन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष एडवोकेट डॉक्टर देशपांडे ,मंडळाचे कार्यवाह व पादुका दौऱ्याचे प्रमुख समर्थ भक्त योगेश बुवा पुरोहित रामदासी, रामदास स्वामी भक्त मंडळाचे अध्यक्ष आर. बी. शिंदे ,कार्याध्यक्ष रवींद्र सबनीस, सचिव भास्कर मेहेंदळे, मंडळाचे विश्वस्त व सातारचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर अच्युत गोडबोले, मधु नेने मधुकर भाजी, मोहन कुलकर्णी, वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव साप्ते. रमण वेलणकर .श्रीकांत शेटे. मोहन कुलकर्णी. धनराज लाहोटी. प्रमोद लाहोटी आदी मान्यवर उपस्थित होते.

या पादुका दौरयाविषयी माहिती देताना योगेश बुवा म्हणाले की, गेली 72 दिवस हा पादुका दौरा मुंबई, गिरगाव, गोरेगाव ,जळगाव, नाशिक ,मध्यप्रदेशातील इंदोर, भोपाळ, उज्जैन, औरंगाबाद, पुणे असा करत आज सातारा येथे पोहोचले . 45 समर्थ सेवेकरी दौर्‍यात सहभागी झाले होते .उद्या शुक्रवारी सकाळी आठ वाजता समर्थ सदन येथून या पादुका सज्जनगड कडे प्रयाण करणार आहेत .सातारचे उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी पुष्पहार घालून पादुकांचे स्वागत केले. समर्थ भक्त रमेश बुवा शेंबेकर ,गणपती बुवा रामदासी यांनी या पादुका स्वागता नंतर रथामध्ये ठेवल्या .राम-लक्ष्मण-सीता यांच्या पंचधातूच्या मूर्ती या रथात विराजमान होत्या. समर्थ रामदास स्वामींचा जयघोष करत ही मिरवणूक पोलीस मुख्यालया मार्गे शेटे चौक ,शनिवार पेठ, सदाशिव पेठ मार्गाने मोती चौकातून राजवाडा येथे आली. त्यानंतर या पादुका समर्थ सदन येथे आज मुक्कामासाठी ठेवण्यात आल्या आहेत. मिरवणूक मार्गावर शेकडो भाविकांनी समर्थांच्या पादुकांचे दर्शन घेतले.