Your Own Digital Platform

प्रकृती अस्वस्थामुळे संमेलनाचे अध्यक्ष फादर दिब्रिटो वसईला परतलेसमारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार की नाही याबद्दल शाशंकता

 
स्थैर्य, उस्मानाबाद : 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नूतन अध्यक्ष फादर दिब्रोटो प्रकृतीच्या कारणामुळे वसईला परतले आहेत. संमेलनाच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमात फादर दिब्रोटो यांनी प्रकृती अस्वस्थतेमुळे मला जायला परवानगी द्या अशी सर्वाना विनंती केली होती.

फादर प्रकृती अस्वस्थतेमुळे उद्घाटनाच्या कार्यक्रमाला व्हील चेअर वरून आले होते. समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार की नाही याबद्दल शशांकता निर्माण होत आहे. 93 व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर दिब्रिटो वसईला परतले आहेत. यामुळे सगळीकडेच चिंता व्यक्त केली जात आहे.