Your Own Digital Platform

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजासाठी चिरंतन काम करा - निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख

कार्यक्रमात बोलताना प्रभाकर देशमुख त्यावेळी व्यासपीठावर प्रदिप विधाते आदी मान्यवर.

स्थैर्य, वडूज : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजासाठी चिरंतन काम उभे करण्यासाठी करावा असे मत निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केले. येरळा दौलत सामाजिक विकास संस्था, खटाव तालुका सोशल फाऊंडेशन व खटाव,माण,कोरेगाव पत्रकार मित्र मंडळाच्यावतीने तालुक्यातील नूतन पदाधिकाऱ्यांचा व आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सोनाली पोळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, खटाव पंचायत समितीच्या सभापती रेखा घार्गे, उपसभापती आनंदराव भोंडवे, बाजार समितीचे सभापती विजयकुमार काळे, उपसभापती राजेंद्र मोरे, सिद्‌धेश्वर कुरोली येथील यशवंत देवस्थानचे अध्यक्ष नंदकुमार गोडसे, यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. याशिवाय यावेळी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मणराव पिसे, पत्रकार धनंजय क्षीरसागर, संदिप कुंभार, महेश जाधव, दत्तात्रय इनामदार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

 व्यासपीठावर जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुनराव खाडे, प्रा.बंडा गोडसे, नंदकुमार मोरे, मठाधिपती रमेश महाराज, ह.भ.प. विजय शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख, पंचायत समिती सदस्य धनंजय चव्हाण, सौ. मेघा पुकळे, बाळासाहेब माने, माजी नगराध्यक्षा सौ. शोभा माळी, डॉ. महेश गुरव, हणमंतराव देशमुख,कृष्णराव बनसोडे, श्रीमती शशिकला देशमुख, राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षा आशाताई बरकडे, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना श्री. देशमुख म्हणाले, सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सर्व भेदाभेद दूर ठेवून जिव्हाळ्याच्या विचाराने एकाच व्यासपीठावर आणण्याचे आदर्श काम येरळा परिवाराच्या माध्यमातून केले जात आहे. खटाव माण तालुक्यातील अनेक राजकीय कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावर चांगल्या संधी मिळाल्या आहेत. आपल्या भागाच्या विकासासाठी, लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी या संधीचा वापर करावा. श्री. विधाते म्हणाले, सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांत सामाजिक ऐक्याचा मेळ घालण्याचे काम येरळा परिवार करीत आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या तालुक्यांतील विकासकामांसाठी सर्वतोपरी सहकार्य राहील.
 
 प्रा. डॉ. पी.डी. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. सोसायटीचे माजी अध्यक्ष, पत्रकार शरदराव कदम यांनी स्वागत केले. अंकुशराव दबडे यांनी आभार मानले. यावेळी गटविकास अधिकारी रमेश काळे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विजय शिंदे, खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष परेश जाधव, प्राचार्य आनंदराव नांगरे, पृथ्वीराज गोडसे, डॉ. संतोष गोडसे, अपंग विकास महासंघाचे राज्य संचालक अमिन आगा, श्री. नांगरे, अभय देशमुख, मोहनराव बुधे, अशोकराव बैले, निलेश घार्गे-देशमुख, मनोज कदम, डॉ. राजेंद्र फडतरे, धनाजी चव्हाण, सुनिल सावंत, चंद्रकांत मोरे, सुर्यकांत कदम, नवनाथ जाधव, विद्यासागर माने, अनिल कदम, कांतआण्णा फडतरे, निलेश घार्गे, प्रमिला पाटोळे,राणी बहेनजी, राणी शिंदे, शबाना मुल्ला, वैशाली माने-पाटील, कल्याणी माने, शारदा भस्मे, आबासाहेब जाधव, प्रमोद खाडे आदिंसह मान्यवर उपस्थित होते.