Your Own Digital Platform

सज्जनगड रस्त्यावर दोघांना मारहाण करुन लुटले


स्थैर्य, सातारा :ठोसेघर ते सातारा जाणाऱ्या रस्त्यावर सज्जनगड फाटय़ाजवळ दुचाकीवरून निघालेल्या दोघांना तीन अज्ञात चोरटय़ांनी लोखंडी रॉडने मारहाण करुन लुटल्याची घटना दि. 24 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये 33 हजार 100 रुपये किमतीचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला. 
 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अक्षय संभाजी पवार (वय 23, रा. देगाव रोड, संभाजीनगर एमआयडीसी सातारा) हा युवक मोटरसायकल वरुन मैत्रिणीला घेऊन दि. 24 रोजी रात्री 8 वाजण्याच्या समारास ठोसेघर ते सातारा जाणाऱया रस्त्यावरून जात असताना सज्जनगड फाटय़ाजवळ तीन अज्ञात इसमांनी त्याची मोटरसायकल अडवली. त्यानंतर अक्षय व त्याच्या मैत्रिणीला रस्त्याच्या कडेला नेऊन त्याच्या डोक्यात व हातापायावर लोखंडी रॉडने मारहाण केली व त्यांच्याकडील मोबाईल, रोख रक्कम असा 30 हजार 100 रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला. याप्रकरणी अक्षय पवार याने सातारा तालुका पोलीस ठाण्यात तीन अज्ञात चोरटय़ाविरुद्ध तक्रार दाखल केली असून त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार बर्गे करीत आहेत.