Your Own Digital Platform

गोपूजमध्ये स्वाभिमानाचा रास्ता रोको....सरसकट सातबारा कोरा करण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

गोपूज येथे रास्ता रोको करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते

स्थैर्य, औंध : देशभरातील 265 शेतकरी संघटनांनी एकत्रित येऊन 8 जानेवारीला ग्रामीण भारत बंद चे आयोजन केले होते. या बंद आंदोलनाला खटाव तालुक्यामध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. या निमित्ताने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गोपूजमध्ये रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी वडूज कराड आणि वडूज औंध या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. महा विकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षांनी निवडणूकीत सात बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते त्याप्रमाणेच आम्हाला संपूर्ण कर्ज माफी हवी आहे म्हणजेच सातबारा कोरा झाला पाहिजे. प्रत्येक प्रामाणिक शेतकरी कर्ज फेडतो त्यालाही या कर्जमाफीचा लाभ होण्यासाठी कर्जमाफी योजनेचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना होण्यासाठी या योजनेतील थकीत शब्द वगळावा ही मागणी यावेळी आंदोलकांनी केली. मोदी सरकारने पुन्हा एकदा प्रादेशिक व्यापार आर्थिक भागिदारी करार (आरसीईपी) करण्याचा घाट घातलाय. यामुळे शेतकरी देशोधडीला लागेल त्यामुळे या कराराला विरोध असल्याचे आंदोलकाने यावेळी सांगितले.

जयसिंगपूर उसपरिषदेत ठरल्याप्रमाने सखा यंदा उसाला एकरकमी एफ आर पी अधिक 200 रुपये तातडीने अदा करावे आणि आश्वासन दिल्याप्रमाणे विजबिल माफी द्यावी या मागन्याही आंदोलनाच्या केंद्रस्थानी होत्या.

यावेळी स्वाभिमानी राज्य प्रवक्ते अनिल पवार, पंचायत समितीचे माजी सभापती संदीप मांडवे, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख, सूर्यभान जाधव यांची यावेळी भाषणे झाली. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत लावंड, ज्येष्ठ नेते सूर्यकांत भुजबळ, दत्तूकाका घार्गे देशमुख, अँड . प्रमोद देवकर, सचिन पवार, यांच्यासह गोपूज, उंबर्डे, वाकेश्वर गुरसाळे, शिरसवडी, भोसरे सह आजूबाजूच्या गावातील असंख्य शेतकरी उपस्थित होते.

सावधानता म्हणून पोलिसानी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.