Your Own Digital Platform

पुण्यात पॅनकार्ड क्लब इमारतीला भीषण आग


पुणे : पुण्यातील बाणेर येथील पॅनकार्ड क्लब इमारतीला भीषण आग लागली आहे. इमारतीतून आगीचे लोट येत असून अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचं काम करत आहेत.

बाणेर परिसरात पॅनकार्ड क्लबमध्ये राहण्यासाठी हॉटेल्ससोबतच सर्व सुविधा आहेत. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास अचानक येथील डोमला आग लागली. नागरिकांनी त्याची माहिती तत्काळ अग्निशमन दलास दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहचल्या. त्यांनी चहुबाजूने आग विझविण्यास सुरुवात केली. आगीमुळे दूर अंतरावरून देखील धुराचे लोट दिसत आहेत. डोम उंचावर असल्यामुळे त्याला आगीने वेढले आहे. त्यामुळे ती आग इतर पसरण्याची शक्यता असल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी विविध बाजूने आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरुवात केली आहे. या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
 
आगीने रौद्ररुप धारण केल्याने संपूर्ण क्लबमध्ये आग पसरली आहे. आग लागली तेव्हा क्लबमध्ये कोणी नसल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही.