Your Own Digital Platform

गुरसाळे प्राथमिक शाळेत अभिरूप बाजार उत्साहात

गुरसाळे प्राथमिक शाळेत भरविण्यात आलेला अभिरुप बाजार. ( छाया : समीर तांबोळी)

स्थैर्य, कातरखटाव : विद्यार्थ्यांच्या व्यवहार ज्ञानात भर पडावी, नाणी -नोटा बरोबरच नफा -तोटा याचे ज्ञान अवगत व्हावे या हेतूने गुरसाळे ( ता.खटाव ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भरविण्यात आलेला अभिरूप आठवडा बाजार उत्साहात संपन्न झाला.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ जाधव यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत बाजाराचा शुभारंभ करण्यात आला. चिमुकल्या बालकानी बाजारात विक्रीसाठी आणलेल्या भाजीपाला, स्नॅक्स, कॉस्मेटिक्स, सौंदर्यप्रसाधने,फळे आदी वस्तुंना पालक ग्राहकांनी दाद देत खरेदी केली. मान्यवरांनी चिमुकलयांच्या दुकानाला भेट देऊन खरेदी करण्याबरोबरच कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिल्याने चिमुकल्याचा आनंद द्विगुणित केला. 
 
बाजार यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका डी.डी. जाधव,एस एन. आत्तार ,ए. ए. ढगे, ए. ए. टिके , एस.एम. काळे आदींनी परिश्रम घेतले .