Your Own Digital Platform

शिवभोजन थाळी आता झेडपी कॅन्टीनमध्ये

जिल्हा परिषद कॅन्टीन येथे आयोजित शिवभोजन थाळी योजनेचा शुभारंभ फीत कापून करताना जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी संजय भागवत, शेजारी वनराज जाधव, किरण शेडगे आदी. मान्यवर

स्थैर्य, सातारा : राज्य सरकारने गरजू आणि गोरगरिबांसाठी सुरू केलेली शिवभोजन थाळी योजना सातारा जिल्हा परिषद तथा झेडपीच्या जुन्या कॅन्टीनमध्ये सुरू करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्या हस्ते फीत कापून शिवभोजन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. ह्यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे- देवकाते यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिवभोजन योजनेच्या शुभारंभप्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांचे स्वागत वनराज जाधव यांनी तर जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे- देवकाते यांचे स्वागत किरण शेडगे यांनी केले. ह्यावेळी जिल्हा पुरवठा विभागातील सुनील शेटे, महेश गंगातीरकर, विश्वनाथ पखाले, वृषाली निंबाळकर , जयंत वीर, महेश उबारे, संतोष दळवी यांच्यासह संग्राम जाधव, प्रशांत जाधव, साहिल शेडगे, मिलिंद महाडिक, विकास धुमाळ, वैभव पोतदार, सुजित जाधव, संजय जाधव आदी. उपस्थित होते.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या भव्य कॅन्टीनमध्ये शासनाच्यावतीने दररोज दिडशे शिवभोजन थाळीची तरतूद करण्यात आली आहे. गरजू आणि गरिबांकरिता केवळ दहा रुपयांत दोन चपाती, भाजी, वरण आणि भात देण्यात येत आहे. दुपारी १२ ते २ ह्या वेळेतच शिवभोजन योजनेचा लाभ घेता येणार आहे तर योजनेचा लाभ शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना घेता येणार नाही, असे पुरवठा विभागाच्यावतीने सांगण्यात आले.