Your Own Digital Platform

भूषणगड जवळील अपघातात अज्ञात युवक ठार
औंध(वार्ताहर):- खटाव तालुक्यातील भूषणगड-पळशी रस्त्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एक ठार तर एक जखमी झाला आहे.दरम्यान अपघातात दुचाकी गाडीचा चक्काचूर झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,भूषणगड-पळशी रस्त्यावर एम. एच.१३ सी.डब्लू ८४५७ या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने मोठा अपघात झाला.यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर जखमीला रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे, हे अपघातग्रस्त युवक मंगळवेढा तालुक्यातील असल्याचे समोर आले आहे. हा अपघात नेमका कसा झाला असावा याबाबत तर्कवितर्क काढले जात आहेत.

दरम्यान रात्री उशिरापर्यंत अपघातात म्रूत पावलेल्या युवकाची ओळख पटविण्याचे काम औंध,पुसेसावळी पोलीसांकडून रात्री उशिरापर्यंतसुरू होते