Your Own Digital Platform

श्रीहरी ट्रॅव्हल्स यशाची उंचच उंच शिखरे सर करेल : ना.श्रीमंत रामराजेसुभाष भांबुरे यांच्या श्रीहरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या वेबसाईटचा शुभारंभ


स्थैर्य, फलटण : तंत्रज्ञानाबरोबर प्रत्येक जण आता बदलत चालला आहे. सुभाष भांबुरे यांच्या श्रीहरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सची वेबसाइट लॉन्च केली आहे. तंत्रज्ञानाबरोबरच श्रीहरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स बदलत आहे व येणाऱ्या पिढीला येत असणारे तंत्रज्ञान आत्मसात श्रीहरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स करत असल्याने आगामी काळात श्रीहरी नक्कीच यशाची उंचच उंच शिखरे सर करेल यात तिळमात्र शंका नाही, असे मत महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी श्रीहरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स वेबसाईट लॉन्चिंग प्रसंगी आयोजित कार्यक्रमामध्ये व्यक्त केले.

या वेळी फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते भीमराव बुरुंगले, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राजनभाऊ फराटे, सातारा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता सुनील गरुड, सातारा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे शाखा अभियंता अजय शितोळे, नामदेव शिंपी समाज ट्रस्टचे अध्यक्ष विजय उंडाळे, सातारा जिल्हा परिषदेमधील सेवानिवृत्त लेखा अधीक्षक चंद्रशेखर हेंद्रे, सद्गुरू मंगल केंद्राचे सर्वेसर्वा दत्तात्रय पवार, व्यापारी असोसिएशनचे दिगंबर कुमठेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये नामांकित यात्रा कंपनी म्हणून सुभाष भांबुरे यांच्या श्रीहरी टॅ्रव्हल्सचे नाव आज घेतले जाते. गेली ३० वर्षे ते या व्यवसायात अग्रेसर असून यात्रेकरुंची आपुलकीने सेवा करणे, धार्मिक सहलींचे सुंदर नेटकेपणाने नियोजन व संयोजन करण्यात त्यांचा हातखंडा आहे. धार्मिक, प्रेक्षणीय सहलींबरोबरच केंद्र व राज्य शासनाद्वारे आयोजित करण्यात येणार्‍या प्रशिक्षण सहलींमध्ये अभ्यासपूर्ण रितीने ते प्रशिक्षणार्थ्यांना योग्य माहिती देण्याचा प्रयत्न करतात. गेल्या १० वर्षांच्या कालावधीमध्ये अभ्यास दौर्‍यांच्या जवळपास 125 शासकीय सहलींचे त्यांनी अत्यंत यशस्वीपणे आयोजन केले आहे.

श्रीहरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स सर्व आगामी टूरची माहिती वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. सदर वेबसाईट डिझाईन करण्याचे काम फलटण येथील नामांकित असलेल्या रेजेक्स टेक्नॉलॉजी यांनी केलेले आहे. श्रीहरीच्या आगामी सहलींची माहिती व श्री हरी टूर्स बद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर http://shriharitours.com/ ह्या वेबसाईटला भेट द्या.