Your Own Digital Platform

माझेरी (पुनर्वसन)ची निवडणूक बिनविरोधरामराजेंच्या नेतृत्वावर विश्वास; ग्रामस्थांनी घडवले एकीचे दर्शन

 
स्थैर्य, फलटण : माझेरी (पुनर्वसन) या गावच्या ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ग्रामस्थांनी एकीचे दर्शन घडवीत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केली व श्रीमंत रामराजे (महाराजसाहेब) यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखविला.
 
या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत राजे गट 6/0 (सरपंच पदासह) विजयी झाले, सरपंचपदी मनिषा ज्ञानेश्वर दिघे, उपसरपंचपदी परबती पांडूरंग दिघे, नवनिर्वाचित सदस्य दत्तात्रय बबन पवार, सदस्या फुलाबाई चंद्रकांत दिघे, अर्चना मारुती सणस, सुनंदा प्रविण दिघे यांची बिनविरोध निवड झाली.
 
याबद्दल सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समिती सभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
 
यावेळी माझेरीचे मा.सरपंच ज्ञानेश्वर दिघे, मा.उपसरपंच विष्णु दिघे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, गणेश दिघे, तंटामुक्ती अध्यक्ष, बाळु दिघे, तसेच सागर दिघे, प्रविण दिघे, विशाल दिघे, युवक, ग्रामस्थ व महिला वर्ग उपस्थित होते.