Your Own Digital Platform

फलटण तालुक्याच्या चौकात रास्ता रोको आंदोलन


स्थैर्य, फलटण : कर्जमाफी सह विविध मागण्यांसाठी आज बुधवार दि.8 रोजी फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी पाटी येथील चौकात शेतकरीनी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी गोखळी आणि पंचक्रोशीतील सर्व विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सभासद साठे,खटकेवस्ती, पवारवाडी आदी परिसरातून मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी आघाडी शासनाने महात्मा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना प्रत्यक्षात शेतकरी कर्जमाफी योजनाच फसवी निघाली .कर्जमाफीसाठी निकष लावण्यात येणार नाही म्हणाले पण लागू केलेल्या कर्ज माफीचा ठरावीक शेतकर्यानाच प्रत्येक कर्जमाफी योजनेत फायदा होत असलेल्यांचा आरोप श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन बजरंग खटके यांनी यावेळी बोलताना केला.यावेळी भारतीय जनता पक्षाचे फलटण विधानसभा प्रमुख पै.बजरंग गावडे बोलताना म्हणाले की, तालुक्याती सर्व शेतकरी सभासद यांना एकञ करून पक्षविरहित शेतकरी कृती समिती च्या माध्यमातून उग्र स्वरूपाचे आंदोलन करून भव्य मोर्चा काढणार असल्याचे सांगितले. गोखळी विकास सोसायटीचे चेअरमन तानाजी बापू गावडे यांनी शेतकरी सभासदांवरील कर्जमाफी योजनेत झालेल्या अन्याय बद्दल शांततेत आंदोलन करण्यात आले. आंदोलनास शेतकरी सभासदांनी मोठ्या संख्येने सहकार्य केल्या बदल आभार मानले. आदींनी आंदोलना विषयी आपले विचार मांडले. यावेळी फलटण पोलीस उपनिरक्षक नितिन सावंत यांना आंदोलकांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी डाॅ.राधेश्याम गावडे,खटकेवस्तीचे सरपंच बापूराव गावडे ,डाॅ.हणमंत गावडे, रघुनाथ ढोबळे, मधुकर गावडे, अनिल धुमाळ, मिलिंद खटके, राधेश्याम जाधव, संतोष खटके, दादासाहेब खटके, पिंटू जगतात, योगेश गावडे, अनिरुद्ध गावडे, प्रल्हाद खटके उपस्थित होते. निवेदनामध्ये पुढील मागण्या करण्यात आल्या पुढील प्रमाणे - नियमित कर्जफेड करणारे शेतकरी सभासदांना रूपये दोन लाख पर्यंत हक्काने लाभ मिळाला पाहीजे, दोन लाखांवरील थकबाकीदार सभासदांना, मध्यम मुदत थकबाकीदार सभासदांना या योजनेचा लाभ मिळावा, पुरग्रस्त व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्याना संपूर्ण कर्ज माफी मिळावी, शेतीमालाला रास्त बाजार भाव मिळावेत. मागण्या निवेदनामध्ये करण्यात आल्या आहेत. निव.रास्ता रोको आंदोलन शांततेत पार पडले. यावेळी फलटण पोलीस उपनिरक्षक नितिन सावंत आणी पोलीस अधिकारी व पोलीस पाटील विकास शिंदे यांनी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली.