Your Own Digital Platform

ऋणनुबंधाचे नाते माजी विद्यार्थ्यानी जोपासले -- श्रीरंग काटेकर

दिपप्रज्वळन करताना माजी विद्यार्थ्यानी कु.अनिता पवार श्रीरंग काटेकर विजय राजे

गौरीशंकर डी फार्मसी लिंब मध्ये माजी विद्यार्थी स्नेह मेळावा

स्थैर्य, सातारा : ऋणनुबंधाचे नाते गौरीशंकर डि फार्मसी लिंबच्या माजी विद्यार्थ्यानी जोपासले असल्याचे मत गौरीशंकर संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्‍त केले आहे ते ९ वा माजी विद्यार्थी स्नेहमेंळवा २०२० च्या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणप्रसंगी बोलत होते.

यावेळी प्रमुख पाहणे कुणाल नरहरे प्राचार्य विजय राजे माजी विद्यार्थी प्रतिनिधी महेश एरंडे अदिची प्रमुख उपस्थिती होती ते पुढे म्हणाले स्नेह आपूलकी जिव्हाळा तेथेचे निष्ठाची खरी भावना निर्माण होते हिच भावना संस्थेच्या प्रगतीला अखेर पूरक ठरते. प्रारंभी स्नेहमेळवा २०२० चे दिपप्रज्वलन माजी विद्यार्थ्यानी अनिता पवार हिच्या हस्ते करण्यात आले प्राचार्य विजय राजे म्हणाळे आजपर्यंत शिक्षण घेवून बाहेर पडलेल्या असंख्य माजी विद्यार्थ्यानी महाविद्यालयावर अलोट प्रेम केळे आहे त्याच्या निरपेक्ष भावना महाविद्यालयाच्या उत्कर्षाला लाभदायक ठरले आहे त्याचे उज्वळ करिअर घडावे यासाठी आम्ही राबविलेले उपक्रम त्याच्या भविष्यसाठी पूरक ठरत आहेत यावेळी अजय घालमे सागर ढवळे स्नेहा मोरे पवन नरवडे शीतळ जाधव मोनाली कदम स्वप्नील लोढे माधूरी जगताप सुदर्शन डोलताडे अमरजित जानकर विशाल बोडके अमर पाटील यांना २०२०चे बेस्ट अल्यमीनी अवार्ड देण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थ्यानी विविध कलानूत्य अविष्कारचे अनोखे दर्शन घडविले तसेच क. अनिता पवार ओंकार यादव यांनी मनोगत व्यक्‍त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क॒.प्राजक्ता भांडबलकर हिने केले प्रास्वविक विजय राजे यानी केळे आभार प्रा.सौ.सविता मोरे यांनी केले.

विशेष शिष्यवृत्ती देवून माजी विद्यार्थ्याचा गौरव

अर्थिक दुष्टाया दुर्बळ घटकातील विद्यार्थ्यानी शैक्षणिक कार्यकालात प्रतिकूलतेवर मात करीत गुणवते बरोबरच इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीकरणारे ज्ञानेश्‍वर पोटे विशाल राठोड कोमल मोरे सुनयना पवार अनिल दवंडे रोहीत काटकर यांना प्रत्येकी २५०० रु ची शिष्यवृत्ती देवून गौरविण्यात आले तसेच राष्ट्रीय पातळीवरील नामवंत कंपनीच्या एम. डी पदवर कार्यरत असणारी व सध्या मॉडेलिंगसाठी राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली आनिता पवार हिचा विशेष सत्कार करण्यात आला.