Your Own Digital Platform

वाईमध्ये पत्रकारांचा गौरव संपन्नस्थैर्य, सातारा : कायदा-सुव्यवस्थेचे काम करताना सांस्कृतिक वाई शहरातील सुसंस्कृत, सकारात्मक पत्रकारितेचा अनुभव आला, असे गौरवोद्गार उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके यांनी काढले.
वाई पत्रकार संस्थेच्या वतीने आयोजित पत्रकार दिन व सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.

कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके यांना जीवनगौरव तर विलास काळे, दिलीप कांबळे यांना विशेष पत्रकारिता आणि संजय वारे यांना ग्रामीण कृषी पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. तहसीलदार रणजीत भोसले, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्येष्ठ विचारवंत सतीश कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते.

श्री. टिके म्हणाले जनतेच्या अपेक्षा खूप असतात त्यामानाने शासकीय यंत्रणांना मर्यादा असतात. उपलब्ध मनुष्यबळ आणि यंत्रणा यात जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे आव्हानात्मक असते. परंतु हे करताना वाई येथील पत्रकारांनी नकारात्मक बातम्या छापल्या नाहीत. त्यांच्या सहकार्यामुळेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसारख्या लोकसहभागाच्या सुविधा सुरक्षिततेसाठी आम्ही उपलब्ध करू शकलो. या निमित्ताने पत्रकारांचा सत्कार हा सत्कार्याचा सत्कार आहे, असे मी मानतो. पत्रकारांनी आजच्याप्रमाणेच सदैव शासकीय यंत्रणांचे डोळे म्हणून काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

तहसीलदार रणजित भोसले म्हणाले. वाईट प्रवृत्तींविरुद्ध समाजमन जागृत करण्याचे काम पत्रकार करतात. आज सोशल मीडियातूनही पत्रकारितेचा अविष्कार होत असतो. कठीण परिस्थितीत काम करूनही पत्रकार समाजातील चांगल्या आणि वाईट बाबी अचूकपणे सर्वांसमोर आणतात.
सतीश कुलकर्णी म्हणाले, सातारा जिल्ह्यातील सामाजिक चळवळीचा व पत्रकारीतेचा कोश असलेल्या व जोखीम घेऊन काम करणाऱ्या विजय मांडके यांना पुरस्कार देण्याने पुरस्काराचाही गौरव झाला आहे. पत्रसृष्टी वाढताना पत्रदृष्टी वाढली का, यावर विचारमंथन होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. ग्रामीण पत्रकारितेत दिव्याखालचा अंधार दूर करणे आणि सामान्य माणसाला अंधारातून प्रकाशाकडे नेणे, ही कामे पत्रकारांना करावी लागतात. असेही ते म्हणाले.

विजय मांडके यांनी मांढरदेव दुर्घटनेच्या बातम्यांचे टीव्हीसाठी वार्तांकन केल्याने ईटीव्ही मराठी कडून सामाजिक सलोख्यासाठीचा गौरव झाला होता त्यानंतर पुन्हा हा वाई येथे गौरव होतो आहे. आई-बाबांनी कष्टानं घडवले आणि सामाजिक कार्याची वाट दाखवली त्या या वाटेवरून चालताना हा पुरस्कार बळ देणार आहे.
पत्रकार संस्थेचे अध्यक्ष सुशील कांबळे, तानाजी कचरे, संजय भाडळकर, बाळासाहेब सणस, नीलेश जायगुडे यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष अशोक येवले यांनी प्रास्ताविकात क्रीडा स्पर्धा व पत्रकारांसाठी कार्यशाळा घेण्याचा मनोदय व्यक्त केला. तानाजी कचरे यांनी आभार मानले.
 
कार्यक्रमात संपादक नितीन जगताप, शिवाजीराव जगताप, प्रेषित गांधी, संजय दस्तुरे, , बापू वाघ,रमेश पलोड, बबनराव ढेबे, अजित कुंभारदरे, सचिन शिर्के, भाऊसाहेब संकपाळ, अजित जाधव, अभिजित खुरासणे, गजानन चेणगे, अजित जाधव, डाॅ. रवींद्र भारती-झुटिंग, विठ्ठल माने,विजय पवार, अतुल संकपाळ, कमलाकर भागवत, आदी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रपतींचा जीवनरक्षा पुरस्कारप्राप्त अमोल लोहार यांनाही गौरविण्यात आले.
 
कार्यक्रमास श्यामराव कर्णे, सुरेश कोरडे, काशीनाथ शेलार,जयवंत संकपाळ, रवी बोडके, रवींद्र घोडराज व वाईकर मान्यवर उपस्थित होते.