Your Own Digital Platform

बॉलिवूडचे कनेक्शन असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांची धाड


बनावट ग्राहक बनून त्यांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला.


मुंबई : शरीरविक्रीचे रॅकेट चालविणाऱ्या बॉलिवूडमधील एका प्रॉडक्शन हाऊसच्या व्यवस्थापकाला जुहू पोलिसांनी अटक केली आहे. यावरून बॉलिवूडचे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांन  यश आले आहे. बनावट ग्राहक बनून त्यांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला. २३ डिसेंबर २०१९ रोजी याच हॉटेलमधून देहविक्रय रॅकेटप्रकरणी तीन महिलांची सुटका करण्यात आली होती.

शरीरविक्री करणाऱ्या रॅकेटमध्ये हात असल्याच्या संशयावरून बॉलिवूडमधील प्रॉडक्शन व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे. हे सेक्स रॅकेट जुहू येथील एका हॉटेलमध्ये चालवले जात होते, अशी माहिती जुहू पोलिसांकडून देण्यात आली. मुंबई उपनगरातील उच्चभ्रू अशा जुहू परिसरात एका हॉटेलमध्ये मुंबई पोलिसांनी धाड टाकून या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. सामाजिक सेवा शाखेकडून या रॅकेटबद्दल गुप्त माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून जुहू येथील हॉटेलवर धाड टाकली. त्यावेळी बॉलिवूडमध्ये प्रॉडक्शन व्यवस्थापकाचे काम करणाऱ्या राजेश कुमार लाल या इसमाला अटक करण्यात आली आहे.
 
या सेक्स रॅकेटमधून पोलिसांनी दोन तरुणींची सुटकाही केली आहे. तसेच उझबेकिस्तानहून तरुणी पाठवणाऱ्या महिलेचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. उझबेकिस्तानची रहिवासी असलेल्या त्या महिलेचे नाव झरिना असून ही महिला राजेश कुमार लाल याच्या मदतीने हे रॅकेट चालवत होती, असे पोलिसांनी सांगितले.