Your Own Digital Platform

पुणे मिडीया वॉचचा ग‘ामीण पत्रकार पुरस्कार प्रा. आढाव यांना जाहीर


स्थैर्य, फलटण : पुणे मिडीया वॉच आणि सिद्धार्थ वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा राज्यस्तरीय ग‘ामीण पत्रकार पुरस्कार फलटण येथील ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती पुणे मिडीया वॉचचे संचालक महेश जांभुळकर यांनी दिली.
 
या पुरस्काराचे वितरण दि. 6 जानेवारी रोजी पुणे येथे करण्यात येणार आहे. याच दिवशी पत्रकार दिन कार्यक‘माचेही आयोजन करण्यात येत आहे. वृत्तपत्र क्षेेत्रात प्रभावी कार्य करणार्‍या पत्रकारांचा गौरव यावेळी करण्यात येणार आहे. हा कार्यक‘म कॅम्प भागातील नवा मोदीखानाजवळील आझम कॅम्पसमधील हॉलमध्ये सायंकाळी 6 वाजता होणार आहे. यंदा या सोहळ्याचे 15 वे वर्ष आहे.
 
यावेळी वृत्तपत्र क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणारे ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे राजकारणाचा नवा पॅटर्न आणि पत्रकारिता या विषयावर व्या‘यान होणार आहे. यानंतर वृत्तपत्र क्षेेत्रात प्रभावी कार्य करणार्‍या पत्रकारांचा गौरव यावेळी करण्यात येणार आहे. यामध्ये फलटण येथील प्रा. रमेश आढाव, महिला पत्रकार प्रयागा होगे, उपनगर वार्ताहर दिगंबर माने, नामदेव ढसाळ हा पत्रकारिता पुरस्कार भीमा कोरेगाव येथील रामदास लोखंडे, बाळासाहेब ठाकरे उत्कृष्ठ व्यंगचित्रकार पुरस्कार अलोक निरंतर, सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालय भवानी पेठ मधील काशेवाडी येथील धम्मपाल सेवा संघाचे लोकशाहीर आण्णा भाउ साठे वाचनालय, सिटीझन जर्नालिस्ट रामदास सूर्यवंशी, इलेक्ट्रॉनिक मिडीया पुणे दर्पण न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी विजय जगताप, गुन्हे वार्तांकनासाठी देवेंद्र जैन, वृत्तपत्र छायाचित्रकार मंदार टण्णू, वृत्तपत्र विक‘ेता, जीवनगौरव, युवा पत्रकार यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देउन गौरवण्यात येणार आहे.