Your Own Digital Platform

शौर्य चक्र सन्मानित शहीद रविंद्र धनावडे यांच्या वीरपत्नी वैशाली धनावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण’


स्थैर्य, सातारा : शौर्य चक्र सन्मानित शहीद रविंद्र धनावडे यांच्या वीरपत्नी वैशाली धनावडे यांच्या हस्ते, मेहता सेल्युलर पोवई नाका येथे 26 जानेवारी रोजी दरवर्षीप्रमाणे, भारताच्याप्रजासत्ताकदिनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम साजरा झाला. 
 
26 ऑगस्ट 2017 रोजी पुलवामा येथील पोलिस कॉम्प्लेक्सच्या निवासी इमारतीमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. त्यावेळेस जवान रवींद्र धनावडे यांनी अतुलनीय कामगिरी करताना दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालत अनेक पोलिस कुटुंबियांचे प्राण वाचविले होते. श्रीमती वैशाली यांनी आपल्या मनोगतामध्ये माझ्या पतीने देशाच्या रक्षणासाठी केलेल्या शौर्याचा अभिमान आहे आणि आपण सर्वांनीच आपापल्या परीने देशसेवा केली पाहिजे असे सांगितले. प्रारंभी पोवई नाका व्यापारी मित्रांच्या वतीने श्री. विजय येवले यांनी त्यांचे स्वागत केले तसेच मेहता परिवाराच्या वतीने सौ. नेहा विवेक मेहता यांनी शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे पोवई नाका व्यापारी मित्रांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ज्यात एका दिवसात 50 पेक्षा जास्त बाटल्या रक्त गोळा झाले. यात गेल्या दहा वर्षात एकूण 600 पेक्षा जास्त बाटल्या रक्तदान करण्यात आले आहे.