Your Own Digital Platform

जाचहाट प्रकरणी पतीसह सासू-सासऱ्या विरोधात गुन्हा


स्थैर्य, सातारा : शारीरिक व मानसिक छळ करून जाचहाट केल्याप्रकरणी पुणे येथील पती व सासू-सासऱ्यांच्या विरोधात महिलेने येथील सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 
 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अश्विनी सुरज वाढई यांचा मेडिकल सुपरिटेंडेंट बंगलो औंध चेस्ट हॉस्पिटल पुणे येथील सुरज लक्ष्मण वाढई यांच्यासोबत विवाह झाला होता, तर गुरुवार पेठ, सातारा हे त्यांचे माहेर असून त्या सध्या येथेच राहत आहेत. अश्विनी यांचेवर संशय घेऊन तसेच इतर कारणावरून दि. 2 सप्टेंबर 2019 ते 23 जानेवारी 2020 दरम्यान पती सुरज लक्ष्मण वाढई, सासरे लक्ष्मण वाढई, व नंदा लक्ष्मण वाढई (तिघे रा. मेडिकल सुपरिटेंडेंट बंगलो औंध चेस्ट हॉस्पिटल पुणे) यांनी शारीरिक व मानसिक छळ करत तिचा जाचहाट केला आहे. याप्रकरणी अश्विनी वाढई यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पतीसह सासू सासरे यांचे विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार ए. सी. पवार करीत आहेत.