Your Own Digital Platform

सद्गुरु पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन


स्थैर्य, फलटण : श्री सदगुरु हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या.फलटण या संस्थेने सभासद़ ठेवीदार व ग्राहकांसाठी तयार केलेल्या 2020 च्या आकर्षक दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला 

यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता, ज्येष्ठ पत्रकार बाबुराव देशपांडे ,पत्रकार प्रा.रमेश आढाव यांचे हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करणेत आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले होते. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हिरालाल गांधी चंद्रकांत साळवेकर,सद्गुरु पतसंस्थेचे चेअरमन राजाराम फणसे, संचालक तुषार गांधी , सुखदेव नायर, सुभाष आढाव़, , पत्रकार अजय माळवे, बाळासाहेब ननावरे , किरण बोळे, नासिरभाई शिकिलगार, रोहित अहिवळे, प्रसन्न रुद्रभट्टे, युवराज पवार, प्रदिप चव्हाण, ,ब्रिलियंट अकॅडमी चे प्राचार्य प्रफुल्ल अडागळे आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्राची परंपरा व संस्कृतीनुसार दिनदर्शिकेत माहिती समाविष्ट करून ती जपण्याचा प्रयत्न केला आहे संस्थेने सुबक़ आकर्षक रंगातील दिनदर्शिका नेहमीप्रमाणे उपलब्ध करून दिली आहे.राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेत्यांची जयंती़ पुण्यतिथी़ हिंदु पंचांगाप्रमाणे विविध मुहुर्त व धार्मिक माहिती उपलब्ध करून दिली आहे. त्याचप्रमाणे संस्थेच्या ठेवी व त्यावरील व्याज दर संस्थेचे अन्य उपक्रम प्रत्येक पानाच्या तळभागावर सद्गुरू व महाराजा संस्था समुह आणि स्वयंसिध्दा महिला संस्था समुहातील विविध संस्था व त्यांच्या प्रमुख पदाधिर्कायांची नावे उपलब्ध करून दिलेली आहे.

सद्गुरु व महाराजा उद्योगसमूहाचे .सरव्यवस्थापक संदिप जगताप यांनी स्वागत केले व आभार मानले. याप्रसंगी शाखा व्यवस्थापक विक्रम भाटिया़ ,राजाराम रणवरे ,महाराजा व सद्गरू संस्था समूहाचे सर्व सेवक वर्ग उपस्थित होते.