Your Own Digital Platform

ऑनलाईन विक्रीच्या विरोधात इलेक्ट्रॉनिक मार्केट बंदफलटण : सर्व कंपन्यांनी ऑनलाईन विक्री बंद करावी, यासाठी फलटण शहर व तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक व्यापाऱ्यांनी देशव्यापी बंदमध्ये आपला सहभाग नोंदवला. फलटणमधील सर्व व्यापाऱ्यांनी एक दिवसासाठी आपली दुकाने बंद ठेवून ऑनलाइन विक्रीच्या विरोधात तीव्र असे आंदोलन जुना डी एड कॉलेज चौक, फलटण येथे केले व ग्राहकांनीही ऑनलाइन पेक्षा ऑफलाइन खरेदीला पसंती द्यावी अशीही ही मागणी व्यापाऱ्यांकडून यावेळी करण्यात आली.
 
या वेळी फलटण तालुका मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक असोसिएशन अध्यक्ष अनिल शिरतोडे, उपाध्यक्ष नितीन बनकर, स्वप्नील टिळेकर, सचिव नितीन जाधव, कार्याध्यक्ष प्रशांत पवार, श्रेयस शहा, सल्लागार योगेश डोईफोडे, विष्णु सूळ, खजिनदार प्रकाश चव्हाण सर्व सदस्य आणि प्रमोटर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.