Your Own Digital Platform

विनयभंग, चोरी प्रकरणी एकावर गुन्हा


स्थैर्य, सातारा : महिलेच्या घरी जाऊन ती झोपेत असताना तिचा विनयभंग करून तिच्या पतीच्या पॅन्टच्या खिशातील 5 हजार रुपयांची रक्कम चोरी केल्याप्रकरणी एकाच्या विरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात महिलेने तक्रार दाखल करण्यात आली आहे. मयुर अशोक नलावडे (वय 21, रा. मंगळवार पेठ, सातारा) असे युवकाचे नाव आहे.
 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 25 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास संबंधित पीडित महिला तिच्या घरात झोपली असताना मयूर नलवडे याने घरात प्रवेश करून तिचा विनयभंग केला. तसेच महिलेच्या पतीच्या पॅन्टच्या खिशातील 5 हजार रुपये रक्कम चोरून नेली. याप्रकरणी पीडित महिलेने शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मयूर नलवडे याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास ए. एस. चव्हाण करीत आहेत.