Your Own Digital Platform

सातार्‍यात गॅदरिंग व मार्केटींगच्या देणगीसाठी रयतचे विद्यार्थी लोकप्रतिनिधी, पदाधिकार्‍यांच्या प्रतिक्षेत


स्थैर्य, सातारा : कर्मवीर भाउराव पाटील यांनी बहुजन समाजाने शिक्षण घ्यावे, यासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. हजारो विद्यार्थी शिक्षित होवून प्रगती करु लागले आहेत. हे वास्तव असले तरी माकेटींग व फनी गेम गॅदरींगच्या नावाखाली सध्या सातारा शहरात रयतचे विद्यार्थी देणगी मागण्यासाठी लोकप्रतिनिधी, पदाधिकार्‍यांच्या प्रतिक्षेत कार्यालय व निवासस्थानी गिरट्या मारु लागले आहेत. दुदैवाने अशा वेळी या विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा मार्मिक प्रश्‍न पालकवर्गाकडून उपस्थित केला जावू लागला आहे. याबाबत गार्भियाने लक्ष दिले नाही तर वरिष्ठ पातळीवर तिव्र आंदोलन करण्याची भूमीका काही पालकांनी बोलून दाखवली आहे.
 
सातारा जिल्ह्यात शाळा, महाविद्यालय, व्यवसायीक शिक्षण घेणार्‍या संस्थेमध्ये अनेक वर्ष स्नेहसंमेलन, गेट टूगेदर, गॅदरिंग, मनोरंजनाचे कार्यक्रम केले जात होते. यामध्ये शिक्षण संस्था, विद्यार्थी व पालक यांचा सहभाग कौतुकास्पद होता. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळत होता. तसेच शिक्षण क्षेत्राच्या आवारात गुरु शिष्य व सर्वधर्म समभाव याचे पालन केले जात होते. अलिकडच्या काळात विशेषत: निवडणूकीमध्ये खूलआम शाळा महाविद्यालयाच्या आवारात प्रचाराचे केंद्र बनले होते. त्यातूनच मग विद्यार्थ्यांनी शिक्षणा ऐवजी गॅदरींगवरच भर दिला. त्यातून मार्केटिंगची निर्मिती सोपी होवू लागली. मार्केटींगसाठी पैसा उपलब्ध व्हावा. यासाठी मग लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्या ओळखीने देणगीचे फॅड रुजू झाले. त्यामुळे आता महाविद्यालय गणवेशात विद्यार्थ्यांना पाहून अनेक पालक नेमका आपला विद्यार्थी महाविद्यालयात शिकत आहे का देणगी मागण्यासाठी गेला आहे. याची चाचपणी करु लागले आहेत. काल दुपारी एका पालकाने आपला विद्यार्थी महाविद्यालयात शिकायला गेल्याचे पाहिले होते. पण त्यानंतर आपल्या पाल्याला पदाधिकार्‍याच्या दालनात पाहून त्या पालकाने कपाळावर हात मारुन घेतला. सध्या महाविद्यालयाच्या पाध्यापकांचे वेतन एक लाखापर्यंत आहे. परंतु पाध्यापक वर्ग कधीही अशा कार्यक्रमाला देणगी देत नाही. मात्र विद्यार्थी शाळा महाविद्यालयाच्या वेळेत देणगी मागण्यासाठी एकत्रीत जात असल्याने तो एक चिंतेचा विषय ठरला आहे.
सातारा ही छत्रपतींची राजधानी आहे. या ठिकाणी विद्यार्थी वर्गाला संस्कार व शिक्षण देणार्‍या विविध संस्था आहे. यामध्ये रयत शिक्षण संस्थेचाही समावेश आहे. पण सध्या चुकीच्या गोष्टी घडत असूनही याबाबत रयत शिक्षण संस्थाच नव्हे तर इतर संस्थाही मुगगिळून गप्प बसल्या आहेत. देशातील जवाहरलाल नेहरु विश्‍वविद्यालयात राजकीय निर्णयामुळे रणकंदल माजले आहे. पोलीसांनी बळाचा वापर करुन विद्यार्थ्यांना मारहान केली. त्याचा निषेध नोंदवला जात आहे. या प्रश्‍नाकडे तटस्थपणे बघणार्‍या प्रवृत्तीसारखे पाहू नये अशी विनंती काही विद्यार्थी संघटनेने केले आहे. पालकांनीही आपल्या पाल्यांना अभ्यासाकडे लक्ष द्यावे अशी सूचना करावी गॅदरीगं महत्वाचे आहे. याचा अर्थ महाविद्यालयाच्या वेळेत देणगी मागण्यासाठी जाणे असा चूकीचा अर्थ काढू नये. जे खूशीने देणगी देतात त्यांनी महाविद्यालयात जावून संबंधीत विद्यार्थ्यांना देणगी देवून आपल्या मनाचा मोठेपणा दाखवावा, असे सूचीत करण्यात आले आहे. याबाबत रयत शिक्षण संस्थेने खूलासा करावा अशी मागणी शिक्षण प्रेमी व पालकवर्गाने केली आहे.