Your Own Digital Platform

न्यू फलटण शुगर वर्क्स लि. ( श्री दत्त इंडिया प्रा. लि.) चा वजनकाटा पारदर्शक


स्थैर्य, फलटण : दिनांक २७/०१/२०२० रोजी साखरवाडी येथील न्यू फलटण शुगर वर्क्स लि. साखरवाडी या

कारखान्याच्या वजनकाट्याची तपासणी भरारी पथकातील सदस्यांनी आज केली. तपासणी नंतर सर्व

वजन काटे अचुक असल्याचा अहवाल कारखान्याला लेखी दिला असून महाराष्ट्र शासन नियुक्त भरारी

पथकाकडून वजन काट्याच्या विश्वासहर्तेची मोहर साखरवाडी कारखान्यास प्राप्त झाली आहे.

मा. जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी फलटण यांचे आदेशानुसार फलटण तहसिल कार्यालयाचे नायब तहसिलदार आर. सी. पाटील सो, फलटणे विभागाचे वैद्यमापनशास्त्र निरीक्षक श्री. श. पा. आखरे सो, मंडल अधिकारी श्री. आण्णा भांगे सो, पुरवठा अधिकारी श्री. मनोज काकडे सो, लेखा परिक्षण श्रेणी -१ विशेष लेखापरिक्षक वर्ग - १ सह. संस्था (साखर) श्री. ए. सी. शिरतोडे सो, तसेच शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी श्री. रविकिरण किसनराव भोसले, सुभाष जाधव (इले. मीडीया सातारा न्यूज), श्री. नितीन यादव (तालुका अध्यक्ष शेतकरी संघटना), श्री. दादा जाधव (उपतालुका अध्यक्ष शेतकरी संघटना) व ऊस उत्पादक शेतकरी या भरारी पथकामध्ये उपस्थित होते.

या वेळी ऊसाने भरलेल्या ट्रक व ट्रॅक्‍टर बैलगाडी यांची कसून तपासणी केली असता वजन मापात कोणत्याही प्रकारची तफावत आढळली नाही. कारखान्याकडे उपलब्ध असलेल्या २० किलो क्षमतेच्या एकूण ८००० किलो वजनाच्या प्रमाणित वजनाने वाहन अधिक वजने यांनी तपासणी करण्यात आली. महाराष्ट्र शासन नियुक्त पथकाकडून न्यू फलटण शुगर वर्क्स लि. च्या वजनकाट्याची तपासणी केली असता ती अचूक असल्याचा निर्वाळा भरारी पथकातील सदस्यांनी कारखान्यास लेखी दिला. व या बाबतचा अहवाल सर्व अधिकारी यांचे स्वाक्षरीने कारखान्याचे व्हाईस प्रेसिडेंट मृत्युंजय शिंदे यांचेकडे देण्यात आला.

न्यू फलटण शुगर वर्क्स चा कारभार असाच या पुढे पण पारदर्शक ठेवण्यात सातत्य राखले जाईल. ऊस पुरवठा करणा-या शेतक-यांचे हित सदैव डोळ्यासमोर ठेवून या पूर्वीच जाहीर करण्यात आलेले आहे कि, आपला ऊस गळीतास पाठविताना वजन करून पाठवावा. आज कारखान्याचे ५३ दिवसांत १३९५१९ मे. टन गाळप झालेले आहे व सरासरी साखर उतारा ११.१८ % आहे. हे सर्व काही ऊस उत्पादक शेतकरी व कामगार बंधू यांनी दाखविलेला विश्वास हिच श्री दत्त इंडिया कंपनीची प्रेरणा आहे. असे मत कारखान्याचे व्हाईस प्रेसिडेंट मृत्युंजय शिंदे यांनी व्यक्त केले. त्यावेळी कारखान्याचे प्रशासन अधिकारी अजित जगताप, केनयार्ड सुपरवायझर पोपटराव भोसले, सुनिल आवटी शेती अधिकारी कदम व माने उपस्थित होते.