Your Own Digital Platform

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात साताऱ्यात मोर्चा

 जमात - ए - उल - हिंद व बहुजन क्रांती मोर्चची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं


आंदोलक व पोलीस यांच्यात शाब्दिक चकमकं


स्थैर्य, सातारा : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA,) व जेएनयू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात जमात उल ए हिंद व बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने सातारा शहरातून बुधवारी दुपारी तीन वाजता भव्य मोर्चा काढण्यात आला .सीएएच्या विरोधात आंदोलना दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली . या भव्य मोर्चात शहरातील बहुजन व मुस्लिम समाजाचे दोन हजार नागरिक सहभागी झाले होते . मोर्चानंतर जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना निवेदन सादर करण्यात आले .

या मोर्चा दरम्यान आंदोलक व पोलीस यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश देण्यावरुन जोरदार शाब्दिक चकमक झाली .नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या निषेधाची धार साताऱ्यात कमी झालेली नाही . जमात उल ए हिंद व बहुजन क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा चौक ते पोलीस अधीक्षक कार्यालय तेथून कर्मवीर पथ पोवई नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला . बहुजन व मुस्लिम समाजाचे बांधव या मोर्चा मध्ये हिरीरीने सहभागी झाले होते . या मोर्चाच्या निमित्ताने मुस्लीम व बहुजन समाजाचा सीएए कायद्याच्या विरोधातील तीव्र आक्रोश दिसून आला . दुपारी अडीच वाजता हुतात्मा चौक येथून सुरू झालेला मोर्चा पोवई नाका ते पोलीस अधीक्षक कार्यालय या दरम्यान काढण्यात येऊन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना निवेदन देण्यात आले . साडेतीन वाजता मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला . सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख व सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता . जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वारालगतचा मार्ग लोखंडी बॅरिकेडसने बंद करण्यात आला होता . तब्बल दोन हजार आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाले त्यावेळी त्या मार्गावरील वाहतूक अन्यत्र वळवण्यात आली .सीएए विधेयक संमत करणाऱ्या मोदी शासनाचा निषेध करण्यात आला . हा कायदा तातडीने मागे घेण्यात यावा, देशातील मुस्लीम बांधव याच मातीतील आहेत त्यांना येथून कोणीच हटवू शकणार नाही , या कायद्याची सक्ती झाल्यास अशीच तीव्र आंदोलने होत राहतील असा इशारा जमात उल ए हिंदच्या पदाधिकाऱ्यांनी दिला . महाराष्ट्रात ठिकाटिकाणी उग्र आंदोलन सुरू असल्याचे बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले . जेएनयू प्रकरणाचा सुद्धा दोन्ही संघटनांच्या वतीने निषेध करण्यात आला . यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देऊन बॅनर झळकावण्यात आले .

साताऱ्यात मुस्लीम व बहुजन बांधवांनी काढलेल्या मोर्चा वर पोलीस अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून होते . जुन्या पेन्शन योजनेसह विविध मागण्यांसाठी तब्बल चौदा शासकीय निमशासकीय संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर नारेबाजी केली . त्यामुळे कायदा सुव्यवस्था सांभाळताना पोलीसांची चांगलीच कसरत झाली . सुरक्षेचा उपाय म्हणून आंदोलन स्थळी जलद प्रतिसाद पथक तैनात करण्यात आले होते .आंदोलक व पोलीस यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयात यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली . आंदोलकांनी नरमाईचे धोरण घेतले व जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना निवेदन सादर करण्यात आले . प्रशासनासाठी ही बुधवारचा दिवस आंदोलन डे ठरला . शासकीय व निमशासकीय संघटनांच्या संपानिमित्ताने 453 शासकीय कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्याचे महसूल विभागाच्या वतीने सांगण्यात आले .