Your Own Digital Platform

’कर्तव्य’मुळे दिव्यांग बांधवांना मिळाली जगण्याची नवी दिशादिव्यांगांचे जीवन सुसह्य करता आल्याचे समाधान- सौ. वेदांतिकाराजे

स्थैर्य, सातारा : पर्यावरण, निसर्ग रक्षणाबरोबरच जनसामान्यांची सेवा करण्याचे काम कर्तव्यच्या माध्यामातून अविरतपणे सुरु आहे. मोतीबिंदू शिबीर असेल, मोङ्गत जयपूर ङ्गूट वाटप शिबीर असेल किंवा तीनचाकी सायकल आणि व्हील चेअर वाटप अशा विविध प्रकाराच्या आरोग्य विषयक शिबीरातून पिडीत लोकांना आपले जीवन आनंदाने जगता यावे, यासाठी प्रयत्न केले जातात. असे उपक‘म सातत्याने राबवून दिव्यांग आणि अपंग बांधवांच्या जीवनाला एक नवी दिशा देवून या सर्व बांधवांचे जीवन सुसह्य करता आले, याचे कर्तव्य सोशल ग‘ुपला मनस्वी समाधान वाटत आहे, असे प्रतिपादन ग‘ुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.

कर्तव्य सोशल ग‘ुपच्या वतीने सातारा शहर आणि परिसरातील सात अपंग व्यक्तींना नवीन तीनचाकी सायकल आणि व्हील चेअर वाटपप्रसंगी सौ. वेदांतिकाराजे भोसले बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव चव्हाण, कर्तव्य सोशल ग‘ुपचे सदस्य विलास कासार, सुहास ओहाळकर, महेश यादव, डी.पी.शेख, रवी पवार, सुनिल भोसले, ओंकार परदेशी, चंदन घोडके आदी उपस्थित होते.
 
यावेळी अनिल नरहर साठे (वय ७२ रा. रामाचा गोट), बाळु त्रिंबक ओव्हाळ (वय ४२ रा. प्रतापसिंहरनगर), दुर्योधन श्रीरंग बाबर (वय ४० रा. गोडोली), रविंद्र बबन बोर्डे (वय ४२ रा. मंगळवार पेठ), ओमकार हणमंत भिसे (वय १५, रा. मंगळवार पेठ), संजय देवरे (वय ५० रा. सायळी ता. जावली) अणि लक्ष्मण भिमराव मुळीक (वय ३३ रा. मंगळवार पेठ) या दिव्यांग बांधवांना कर्तव्य सोशल ग‘ुपच्यावतीने मोङ्गत तीनचाकी सायकल, व्हील चेअर भेट देण्यात आली. बहुतांश दिव्यांग बांधव शेतकरी अथवा कष्टकरी असतात. त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, त्यांच्या दैनंदीन कामकाजात त्यांच्या शरीराला मदत मिळावी या उद्देशाने कर्तव्य सोशल ग‘ुपच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना तीनचाकी सायकल आणि व्हील चेअरचे मोङ्गत वाटप सातत्याने केले जाते. त्याचा लाभ अनेक दिव्यांग बांधवांना झाला आहे आणि यापुढेही होत राहील, असे सौ. वेदांतिकाराजे यांनी यावेळी स्पष्ट कले. लाभार्थी दिव्यांग बांधवांनी कर्तव्य सोशल ग‘ुपचे आभर मानून आपली कृतज्ञता व्यक्त केली.