Your Own Digital Platform

तीन तासांत कोटींचा चुराडा!मुंबई : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आणि देशांतर्गत अस्थिरतेने धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी शेअर बाजार उघडताच जोरदार विक्री केली. यामुळे सेन्सेक्स तब्बल ७०० अंकांनी कोसळला आहे. दुपारी १२.३० वाजता मुंबई शेअर बाजारातील कंपन्यांचे बाजार भांडवल १५४ लाख कोटींपर्यंत कमी झाले आहे. या पडझडीत गुंतवणूकदारांचे तीन लाख कोटींचे नुकसान झाले आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत तब्बल २०० अंकांची पडझड झाली असून तो १२ हजार १८ अंकांवर आहे.

सकाळपासून सुरु असलेल्या पडझडीने सेन्सेक्स ४० हजार ७६० अंकापर्यंत खाली आला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत तब्बल २०० अंकांची पडझड झाली आहे. चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयात ३१ पैशांचे अवमूल्यन झाले. तो ७२. ११ वर व्यवहार करत आहेत. दुपारी १२.३० वाजता मुंबई शेअर बाजारातील कंपन्यांचे बाजार भांडवल १५४ लाख कोटींपर्यंत कमी झाले आहे. बाजार सुरु होण्यापूर्वी बाजार भांडवल १५७ लाख कोटी होते. बाजारात विक्रीचा इतका जोरदार सपाटा आहे की पाच पैकी चार शेअरमध्ये घसरण होत आहे. शेअर बाजारात २२९ शेअरनी वर्षभराचा नीचांकीस्तर गाठला आहे. अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आणखी वाढला आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराकवर कठोर निर्बंध लादण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर आशियासह प्रमुख बाजारात पडसाद उमटले. यामुळे खनिज तेलाचा भाव ७५ डॉलरपर्यंत वाढेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
 
याशिवाय भारतातील घडामोडींचे परिणाम शेअर बाजारावर दिसून आले आहेत. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचारानंतर देशभर आंदोलन सुरु झाले आहे. दुसरीकडे मंदीमुळे कर संकलन कमी झाल्याने सरकारने खर्चाला कात्री लावली आहे. पुढील दोन महिन्यात किमान दोन लाख कोटींनी खर्च कमी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. यामुळेही गुंतवणूकदारांवर परिणाम झाला आहे.