Your Own Digital Platform

सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी पूर्व नोंदणीचे आवाहनस्थैर्य, वाठार स्टेशन : सोळशी ता. कोरेगाव येथिल जागृत देवस्थान श्री तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थान ट्रस्ट व मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज यांच्या पुढाकाराने या ठिकाणी सर्वजातीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे गुरूवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले असून त्यासाठी संबंधित गरजूनीं पूर्व नोंदणी करावी असे आवाहन टृस्टच्यावतीने मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज यांनी केले आहे.देवस्थानच्यावतीने वधू-वरास संपूर्ण पोशाख,संसार उपयोगी भांडी,धार्मिक विधी व वऱ्हाडी मंडळींना मोफत भोजन दिले जाणार आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मुलाचे व मुलीचे वय अनुक्रमे २१ व १८ वर्षें बंधनकारक अासल्याचे नंदगिरी महाराजांनी सांगितले असून त्यासाठी पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, फोटो या कागदपत्रांसह नाव नोंदविणे गरजेचे आहे.

तरी या संधीचा जास्तीत जास्त गरजूनीं फायदा घेण्याचे आवाहन टस्टच्यावतीने करण्यात आले आहे.