Your Own Digital Platform

कलेढोण द्राक्ष" म्हणून मानांकन मिळविण्यासाठी कलेढोण भागातील शेतकऱ्यांनी प्रयत्नशील रहावे - मंगेश भास्कर

 शेतकरी मेळाव्याचा शुभारंभ करताना मंगेश भास्कर, महेश झेंडे,अरुण जाधव,सुरेशशेठ शिंदे, दिलीप दाभाडे,गोविंद हांडे व अन्यस्थैर्य, औंध : "कलेढोण द्राक्ष "म्हणून याभागातील द्राक्षांना मानांकन मिळावे यासाठी कलेढोण परिसरातील
शेतकऱ्यांनी प्रयत्नशील रहावे असे आवाहन नाशिक येथील सहयाद्री फार्मर्स प्रोडयुसर कंपनीचे संचालक व तज्ञ मार्गदर्शक मंगेश भास्कर यांनी केले.

कलेढोण ता. खटाव येथे आयोजित निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हा कूषी अधिकारी महेश झेंडे, तालुका कूषी अधिकारी अरुण जाधव,राजेंद्र लोखंडे,विशाल कदम,महेश वरुडे,मंडल कूषी अधिकारी दिलीप दाभाडे, सुरेशशेठ शिंदे,संजीव साळुंखे, चंद्रकांत यलमर,शेखर महाजन,शिवाजी जाधव,सुदाम माळी,निलेश कदम आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना भास्कर पुढे म्हणाले की,निर्यातक्षम द्राक्ष निर्मितीसाठी रेसिडयु फ्रि असणे गरजेचे आहे. विषमुक्त फळे खाण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यासाठी आवश्यकतेनुसार द्राक्ष पिकांची काळजी घेणे गरजेचे आहे.यासाठी सेंद्रिय शेती ही आता काळाची गरज बनली आहे.

फळाच्या चांगल्या वाढीसाठी इम दोन व बिव्हेरियाचा वापर करावा. यामुळे द्राक्ष फळाचा आकार, रंग,चव यामध्ये चांगला फरक आढळून येण्यास मदत होणार आहे. पुणे येथील कूषी आयुक्तालयातील तांत्रिक सल्लागार गोविंद हांडे यांनी फलोत्पादन पिकाच्या वेगवेगळ्या योजना, निर्यातधोरण कसे राबविले जाते याची सविस्तर माहिती दिली.

कलेढोण भागातील हवामान द्राक्ष पिकासाठी चांगले असल्याची माहिती त्यांनी दिली याभागातील द्राक्ष निर्यातक्षम करावयाची असतील तर त्यासाठी विष व किटकमुक्त फळे पिकविणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य शासन तसेच कूषी विभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल यासाठी शेतकऱ्यांनी प्रशिक्षण घेऊन आधुनिक शेती करावी.कलेढोण भागातील द्राक्षांना वेगळे स्थान प्राप्त करून देण्यासाठी शेतकऱ्यांनी तत्पर रहावे.
यावेळी महेश झेंडे,अरुण जाधव यांनी ही फळलागवडीचे महत्त्व सांगितले. या मेळाव्यास मायणी,विखळे,गुंडेवाडी,मोराळे,निमसोड,अनफळे,म्हासुर्णे, हिंगणे,गारुडी, कान्हरवाडी,चितळी आदी भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन मंडल कूषी अधिकारी दिलीप दाभाडे यांनी केले. आभार बोडके यांनी मानले.