Your Own Digital Platform

सातारा- जावलीतील प्रमुख रस्ते, पुलांसाठी केंद्राकडून निधी द्या - आ. शिवेंद्रसिंहराजे

ना. नितीन गडकरी यांना निवेदन देताना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले. शेजारी मान्यवर ...

१२ कामांसाठी केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांना दिले निवेदन

स्थैर्य, सातारा : सातारा- जावली मतदारसंघात विकासकामांचा झंजावात सुरु ठेवणार्‍या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदार फ़ंडसह  जिल्हा नियोजन, राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी नेहमीच प्राधान्य दिले आहे. सातारा आणि जावलीतील विविध रस्ते आणि पुलांच्या बांधकामासाठी केंद्राकडून निधी मिळावा, अशी आग्रही मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे केली. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिलेल्या निवेदनानुसार बहुतांश कामांसाठी निधी उपलब्ध करुन देवू, अशी ग्वाही ना. गडकरी यांनी यावेळी दिली.

आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिल्ली येथे ना. गडकरी यांची भेट घेतली. यावेळी सातारा- जावली मतदारसंघातील विविध रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी केंद्राच्या रस्ते निधी योजनेतून निधी मिळावा या मागणीचे निवेदन ना. गडकरी यांना दिले. सातारा तालुक्यातील भोंडवे, अंबवडे (बु.), कुरुलबाजी, कुडेघर, रोहट, पाटेघर, धावली (उरमोडी रिंग रोड) ओ.डी.आर. ६० मधील ०/०० ते १३/०० किमी रस्ता मजबुतीकरण करणे, परळी, बनघर, कुस (खु), ताकवली, निगुडमाळ, केळघर, धावली ते एम.डी.आर. २६ रस्ता आ.डी.आर. ६१ मधील ०/०० ते १५/०० किमी रस्त्याचे मजबुतीकरण करणे, महामार्ग ४ ते शेंद्रे, वेचले, डोळेगाव, भाटमरळी, कुसवडे, पिलाणी आ.डी.आर. ५३ रस्ता ०/०० ते १०/५०० किमी रस्त्याचे मजबुतीकरण करणे. राज्यमार्ग १४० ते सोनगाव, कुमठे, आसनगाव रस्त्यावरील मु‘य पुलाचे बांधकाम करणे, जकातवाडी ते शहापूर जाणार्‍या रस्त्यावरील मुख्य पुलाचे बांधकाम करणे या कामांसाठी निधी देण्याची मागणी केली आहे.

जावली तालुक्यातील राज्यमार्ग १४० ते आंबेघर, डांगरेघर, पुनवडी, केडंबे, बोंडारवाडी, ०/००ते १३/५०० किमी रस्त्याचे मजबुतीकरण करणे. राज्यमार्ग १४० ते वरोशी, वहीटे, मोकवली, ०/०० ते ५/०० किमी रस्त्याचे मजबुतीकरण करणे. प्रमुख जिल्हा मार्ग २६ गोगवे, वरसोळे, गाळदेव, वागदरे, म्हाते, मोहाट, गांजे, तांबी, काळोशी, निजरे, कामठी, वेळे, कण्हेर ०/०० ते १७/०० किमी रस्त्याचे मजबुतीकरण करणे. सातारा, कास, बामणोली, वाकी, तापोळा, महाबळेश्‍वर २०/०० ते ६०/०० किमी रस्त्याचे मजबुतीकरण करणे. कोयना बॅक वॉटर वाकी ते तापोळी, व्ही.आर. १५८ येथे मुख्य पुलाचे बांधकाम करणे. हुमगाव ते बावधन ०/०० ते १३/०० किमी रस्त्याचे मजबुतीकरण करणे. महामार्ग ४ ते आनेवाडी, सायगाव, मोरघर, वागेश्‍वर ०/०० ते १४/०० या रस्त्याची दुरुस्ती व मजबुतीकरण करणे या कामांसाठी निधी मिळावा, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे.
महाबळेश्‍वर, कास पठार, उरमोडी धरण, सज्जनगड, भांबवली आणि ठोसेघर धबधबा, बामणोली, तापोळा, वासोटा किल्ला आदी पर्यटनस्थळांना जोडण्यासाठी आणि पर्यटकांच्या सोयीसाठी तसेच मतदारसंघातील पर्यटनवाढीच्या दृष्टीने नमूद केलेल्या कामांना निधी मिळणे आवश्यक असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले. चर्चेअंती मागणी केलेल्या बहुतांश सर्व कामांना निधी देण्याचा प्रयत्न करु, अशी ग्वाही ना. गडकरी यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांना दिली.