Your Own Digital Platform

पाचगणीतले गांधीजींचे वास्तव्यस्थान


महात्मा गांधी यांची एकशे पन्नासावी जयंती येत्या 2 ऑक्टोबरला आहे. त्यानिमित्ताने महात्मा गांधी यांचे
साधेपण, निसर्ग विषयक प्रेम, कार्यकर्त्यांविषयीच्या भावना, आपली प्रिय पत्नी कस्तुरबा व स्वीय सहायक महादेवभाई देसाई यांच्या निधनानंतर झालेले दुख, वेदना, पाचगणीत प्रार्थने दरम्यान त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा प्रयत्न या सगळ्यांशी पाचगणीचे एक भावनीक नाते आहे. तेथील बाथास्कूल, मेडस्टोन, दिलखुश बंगला या सर्व वास्तुंना महात्मा गांधी यांचा पदस्पर्श झाला आहे. पाचगणीत ते वास्तव्यास नेहमीच असायचे या संदर्भात काही वेगळे लिहता येईल का यासाठीचा हा छोटासा प्रयत्न.

 महात्मा गांधी आणि पाचगणी म्हटल की, आपल्याला नजरेसमोर येत महात्मा गांधी यांच्यावर ते प्रार्थना
करीत असताना त्यांच्यावर करण्यात आलेला हल्ल्याचा प्रयत्न. यावर अनेकांनी लिहिले आहे. अनेकांनी सांगितले आहे.त्या परिसरातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक भि.दा. भिलारे गुरुजी व मणिशंकर पुरोहित यांनी हल्लेखरोस अडवलं, पकडले व बाहेर घालवून दिले. या संदर्भात महात्मा गांधी यांच्या हल्ला कटाची चोकशी करण्याकरीता नियुक्‍त केलेल्या कपूर अहवालात सर्वे माहिती आहे. यावर मी लिहाणार नाही. मी जरावेगळ्या विषयावर लिहितोय.

महात्मा गांधी यांनी सातारा जिल्ह्यातील पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणी वास्तव्यास असताना 1944
सालच्या जुलै महिन्यात पेसी वीरजी यांच्या मेडस्टोन या जुन्या विस्तीर्ण बंगल्याच्या आवारातील मोठ्या बागेत एक झाड लावले होते. तेही गुल मोहराचे... सांगून खरं वाटणार नाही. पण ते खर आहे. अगदी 1997 सालापर्यंत हे गुलमोहराचे झाड होते. पण 1997 साली आलेल्या वादळी पावसात ते झाड उन्मळून पडले. पण या झाडाच्या तीन फांद्या तीथं लावण्यात आल्या. महात्मा गांधी यांची स्मृती आजही आपल्याला आठवण करुन देत ती जुलै 1944 च्या महात्मा गांधी यांनी लावलेल्या गुलमोहर या झाडाची.

महात्मा गांधी यांनी त्यांच्या जिवनात दोनच झाडे लावली. एक लंडनमधील केव्ह (९6९५) गार्डनमध्ये अनं
दुसरे पाचगणीच्या मेडस्टोन बंगल्याच्या आवारातील लावलेले गुलमोहराचे. या संदर्भातील मजेशीर गोष्ट आहे. इंग्रज वंशाच्या जॉन चेसेसन यांनी मेडस्टोन हा बंगला बांधला, हा सध्या हेरिटेज वास्तु आहे. या मेडस्टोन बंगल्याच्या आवारातच महात्मा गांधी यांनी गुलमोहराचे झाड लावले.

पुण्यातील कारागृहातून सुटल्यानंतर महात्मा गांधी हे जुलै 1944 मध्ये पाचगणी येथील दिलखुश बंगल्यात
रहायला आले. ते मलेरीयाने आजारी होते म्हणून त्यांना विश्रांतीचा सल्ला दिल्याने ते पाचगणीत आले होते. याचवेळी त्यांची पत्नी कस्तुरबा व स्वीय सहायक महादेवभाई देसाई यांच्या निधनाच्या दुखाचे सावटानेही त्यांना घेरले होते. त्यामुळे ते दु:खी होते. म्हणून पाचगणीत आले होते.

पाचगणीमध्ये जुलै 1944 ला महात्मा गांधी आले. ते दररोज सकाळी बाथा हायस्कूलमध्येच प्रार्थना घ्यायचे
आणि या स्कूलच्या शेजारीच दिलखुश बंगल्यामध्ये ते रहायचे. एकेदिवशी सकाळी सकाळी मेडस्टोन बंगल्याच्या प्रवेशदूवारापासून एक व्यक्‍ती एक बास्केटमधून फळे व फुलले घेवून येताना मेडस्टोनचे रहिवाशी पेसी वीरजी यांनापाहिले. बास्केट घेवून येणाऱ्यानच त्यांना सांगितले की हे महात्मा गांधी यांनी पाठवले आहे. वीरजी यांनासुद्‌धा हे समजेना की गांधीची व आपत्री तशी ओळख नाही. त्यांना राजकारणात समाजकारणात रस नाही तरीही भेट कशी पाठवली गेली. त्यांना चोकशी करता असे समजले की, गांधी यांनी त्यांच्या चाहत्यांनी दिलेली फळे, फुले ते आजारी व्यक्‍तींना देत असत. वीरजी यांची पत्नी पेसी यांची छोटी बहिण शिरेन (सिली) तीला संधीवाताचा त्रास होत होता. तीच्यासाठी ही भेट गांधींनी पाठविल्याचे दिसते. शिरेन हीने तातडीने गांधींना धन्यवादाचे पत्रही दिले. सलग दुसऱ्यादिवशीही अशीच भेट आली. काही दिवसानंतर महात्मा गांधी यांना पाचगणीत भेटायला आलेल्या दादाभाई नौरोजी यांची नात असलेल्या खुर्शिद नौरजी हीने महात्मा गांधी यांनी शिरेन हीच्या नावाने लिहिलेले पत्र वीरजी कुटूंबीयांना दिले. हे पत्र गुजराती भाषेत लिहिलेले व त्यावर दि.17 जुले 1944 अशी तारीख आहे.

वीरजी यांच्याशी प्रत्यक्ष त्यांच्या मेडस्टोन या बंगल्यात महात्मा गांधी यांची भेट झाली. त्याची ही एक
गंमतीशीर गोष्ट सांगितली जाते. दि. 30 जुलै 1944 रोजी वीरजी यांचा मोठा मुलगा जालच्या वाढदिवसाची तयारी सुरु होती. त्याचवेळी प्रवेशद्वारापाशी गडबड झाल्याचा आवाज वीरजी कुटूंबीयांना आला. त्यांना प्रवेशद्वारापाशी चक्क महात्मा गांधी हातात काठी घेवून घराच्या दिशेने येताना दिसले. त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. त्यांना काय करावे हे सुचेनासे झाले. ते गडबडून गेले. त्यांनी छायाचित्रात, फोटोत पाहिलेले गांधी प्रत्यक्षात त्यांच्या घरातच आलेले विरजींनी प्रत्यक्ष अनूभवले. पुण्याच्या एप्रेस गार्डनमधून दोन दिवसापूर्वी विकत घेतलेले गुलमोहाचे रोपटे त्यांनी मेडस्टोनच्या आवारात लावायचे होते. ही कल्पना गांधीजींनी त्यांच्या सोबत असलेल्या डॉक्टरांना दिल्ली. त्यावेळी डॉक्टरही गडबडले. डॉक्टर गांधींना म्हणाले की, तुम्ही आजारी आहात जास्त हालचाली करु नका, तुम्हाला जर काही झाले तर देशाला मला उत्तर द्यावे लागेल. ही गोष्ट वीरजींना त्यांनी सांगितली.

गुलमोहराचे रोपटे लावल्यानंतर गांधींनी त्यास पाणी घातले माती व्यवस्थीत केली. हे वीरजींना आठवत होते.
एवढेच नव्हे तर गांधी यांनी शिरेन हिच्या प्रकतीची चोकशी केली व तीला भेटण्याची इच्छा व्यक्‍त केली. शिरेन ज्या खोलीत नेहमी विश्रांती घ्यायाची त्या खोल्रीत गांधीजी गेले तीच्याशी बराच वेळ गप्पा मारल्या व काही गोष्टी प्रेमाने सांगितल्या. विशेष म्हणजे शिरेन ही उत्कृष्ट शिल्पकार होती. तीने गांधींना त्यांचे शिल्प करण्याविषयीही विचारले. गांधींनी तीला आवश्यक ते सर्व सहकार्य शिल्प करण्यासाठी दिले. महात्मा गांधी पाचगणीमध्ये साधारपणे जुलै 1944 राहिल्याची नोंद राजमोहन गांधी यांच्या लिखणातून आपल्याला सापडते.
पाचगणीमध्ये महात्मा गांधी यांना भेटायला अनेक बडे काँग्रेस नेते यत असत. सरहद गांधी, मौलाना आझाद,
सरदार पटेल, राजगोपालचारी आदी अनेक मान्यवर नेते पाचगणीत गांधीना येऊन भेटले आहेत. गांधीजींना पाचगणीतील वास्तव्या दरम्यान इंग्लंडचे तत्कात्रीन पंतप्रधान विर्स्टन चर्लिल, भारतीय ब्रिटीश व्हॉइस रॉय लॉड अचिबाल्ड वावेल आणि मुस्लीम लिगचे तत्कालीन अध्यक्ष मोहंमद अली जीना यांना भारतीय स्वातंत्र्यपूव काळातील समस्यांबाबत चर्चेसाठी पत्रे लिहिल्याची राज मोहन गांधी यांच्याकडे नोंद सापडते. विशेष म्हणजे शिरीन हीला ज्या दिवशी म्हणजे दि.17 जुलै 1944 रोजी महात्मा गांधी यांनी पत्र लिहिले होते. त्याच दिवशी विस्टर्न चर्चिल तसेच मोहंमद अली जीन यांना पत्र लिहिल्याची नोंद आहे.

जीना यांना लिहिलेल्या पत्रामध्ये महात्मा गांधी म्हणतात की, मी कारागृहातून मुक्‍त झाल्यानंतर आपल्याला
पत्र लिहिले नव्हते. आज मला माझे हृदय सांगतेय की तुम्हाला मी पत्र लिहावे. तुम्ही ज्यावेळी म्हणाल तेंव्हा आपण भेटू मला निराश करु नका. दुसरे म्हणजे महात्मा गांधी 1944 ला पाचगणीत असताना राष्ट्रसेवादलाचे अनेक स्वयंसेवक त्यांची सेवा करण्यासाठी सज्ज होते. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक भि. दा. भिलारे गुरुजी हे त्यावेळी सेवादलाचे तालुका प्रमुख होते.

भिलारे गुरुजी हयात असताना ते सांगत असत की या स्वयंसेवकांकडून गांधीजी यांनी काहीच सेवा करुन घेतली नव्हती. महात्मा गांधी यांना सेवादल सैनिकांनी मानवंदना व सुतांजली अर्पण केली होती. वैष्णव जन तो तेणे कही ए, जो पर पीड जाने रे तसेच घरघूपती राघव राजाराम, पतित पावन सिताराम या प्रार्थना म्हटल्या जायच्या बाथा स्कूलच्या प्रार्थना कार्यक्रमात. प्राथना सुरु असताना 1944 जुलै महिन्यात नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे, करकरे, नारायण आपटे हे चोंघे प्राथना सुरु करण्यापूर्वी गांधीजींच्या दिशेने येण्याचा प्रयत्न करीत होते. हा पवित्रा बघितल्याबरोबर भिलारे गुरुजी, डॉ. सावंत भाऊसाहेब भिलारे, बाबुराव ओंबळे, बापुसाहेब उंबरकर, मणिशंकर पुरोहीत यांनी त्यांना अडवीले. नथूरामच्या हातातून सुरा काढून घेऊन त्यांना धक्के मारुन प्रार्थनस्थळापासून बाहेर हाकलले. त्याही परिस्थितीत महात्मा गांधी यांनी लांबूनच हात हलवून त्यांना मारु नका असे सांगितले. नथुरामाला महात्मा गांधी यांनी भेटायला बोलवले पण तो काही भेटायला गेला नाही. या सर्व घटनेची माहिती महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी यांनी लिहिली आहे. तसेच महात्मा गांधी यांच्या हत्येच्या कटाची चोकशी करण्यासाठी नियुक्‍त केलेल्या आयोगाच्या अहवालाचा खंड एक मध्ये आहे.

याच कालावधीत प्रार्थना सुरु असताना एके दिवशी कर्मवीर भाऊराव पाटील, पी.जी. पाटील यांना घेवून महात्मा
गांधी यांना भेटायला आहे होते. पी.जी. पाटील हे परदेशी शिक्षणासाठी चालले असताना त्यांना कर्मवीर भाऊराव पाटील यांचे सहायक व महात्मा गांधीचे आशिर्वाद पाचगणीत मिळाले.

महात्मा गांधी यांचे पाचगणीतील वास्तव्यस्थान, प्रार्थनेचे ठिकाणी नक्कीच स्फुर्तीदायी व प्ररेणादायी आहे,
यात काही शंका नाही. महात्मा गांधी यांच्या एकशे पन्नासाव्या जयंती निमित्त त्यांना विनम़ अभिवादन.

ज्येष्ठ पत्रकार विजय द. मांडके