Your Own Digital Platform

सातार्‍यात कौशिक प्रकाशन तर्फे जेष्ठ नागरीकांसाठी लेखनस्पर्धेचे आयोजन


सातारा : येथील अरुण गोडबोले यांच्या कौशिक प्रकाशन तर्फे याही वर्षी जेष्ठ नागरीकांसाठी कौशिक लेखन स्पर्धा 2020 चे आयोजन करण्यात आले आहे. जेष्ठ नागरीकांना आपले विचार मांडण्याची असलेली सुप्त इच्छ प्रकट करण्यासाठी व्यासपीठ व उत्तेजन मिळावे तसेच माय मराठी भाषेची अभिवृध्दी व्हावी यासाठी गेली चार वर्षे हा अभिनव उपक्रम यशस्वी होत आहे. या वर्षी हा 5 वा व शेवटचा उपक्रम असून या स्पर्धेसाठी एक हजार रुपये व सन्मानचिन्ह असे दोन प्रथम पुरस्कार रुपये 750 व सन्मानचिन्ह असे दोन व्दितीय पुरस्कार रुपये 500 व सन्मानचिन्ह असे दोन तृतीय पुरस्कार आणि प्रत्येकी 300 रुपयाचे उत्तेजनार्थ तीन पुरस्कार दिले जाणार आहेत.

या स्पर्धेसाठी कोणत्याही भाषेतील एखादी कलाकृती आवडते व तिची कथा, संवाद, अभिनय, मनाला अनेक वर्षे आनंद देत राहते अशा कलाकृती विषयी - मला आवडलेले नाटक/सिनेमा / टिव्ही सिरीयल हा विषय असून दुसरा विषय इच्छा मरनाचा कायदेशीर हक्क असा आहे. या विषयावर अनेकदा वय झाल्यावर अपंगत्व / गंभीर आजारपण / परावलंबित्व / आर्थिक विवंचना / कौटुंबीक कलह अशा दुदैवी किंवा आता सर्व मिळाले अशा कृतार्थ भावनेमुळे जीवनाला पुर्ण विराम मिळावा असे वाटते अशा वेळी त्याला इच्छामरण पत्करण्याचा कायेदेशी अधिकार असावा का? या विषयी आपण लेखन करु शकता.
 
या स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख 1 मार्च 2020 असून 1 जानेवारी 2020 रोजी 60 वर्षे पुर्ण केलेल्या जगातील सर्व स्त्री पुरषांसाठी खुली आहे. आपला लेख मराठीत सुवाच्च अक्षरात किंवा टाईप करुन पाठवावा. प्रवेशिके बरोबर प्रवेश फी म्हणून 70 रुपयांचा डीडी / अ‍ॅट पार चेक कौशिक प्रकाशनचे नावे पाठवावा अधिक माहिती साठी फोन क्रमांक 9850943041 यावर संपर्क साधावा, सर्वोत्कृष्ठ 15 लेख ग्रंथरुपात प्रकाशीत करण्याचा विचार आहे. स्पर्धेचा निर्णय 9 एप्रिल 2020 पूर्वी कळविला जाईल तसेच प्रत्येक स्पर्धकाला सहभार कृतज्ञता पत्र दिले जाईल. अशी माहिती अरुण गोडबोले यांनी दिली