Your Own Digital Platform

सातारा जिल्हा आधिकारी कार्यालयासमोर उग्र स्वरुपाची निदर्शनेस्थैर्य, सातारा :  बुधवार दिनांक 8 जानेवारी 2020 रोजी देशव्यापी कामगांरांचा संप आयोजीत करण्यात आला आहे. जागतीकीकरण खाजगीकरणाच्या धोरणाने देशातील सार्वजनिक मालमत्तेची लूट होत असून ही लूट करताना उद्यागातील कामगारांना कंत्राटी पध्दतीने कामावर ठेवून किमान वेतनही मिळत नाही तर दुसर्‍या बाजूस सरकारच्या उपक्रमातील कामगारांना मोबदल्यावर राबवून घेतले जात आहे.
 
आशा व सुपरवायझर ना शासकीकय कर्मचारी दर्जा द्या 21,000 रुपये किमान वेतन द्या. सप्टेंबर 2019 मध्ये झालेल्या संपात आशा प्रमाणात सुपरवाझरना सुध्दा मानधनात वाढ द्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणूकीत केलेल्या कामाचा भत्ता त्वरीत द्या, संपात मान्य झालेली 2000 रुपयांची मोबदला वाढ आशांना त्वरीत द्या तसेच आशा व सुपरवाझर यांना विना मोबदला कोणतेही काम सांगू नका आदि मागण्यांसाठी आज संघटनेने सातारा जिल्हा आधिकारी कार्यालयासमोर उग्र स्वरुपाची निदर्शने केली,
 
या निदर्शनामध्ये आनंदी आवघडे, सिमा भोसले, वंदन चव्हाण, शिल्पा साळुंखे, मनिषा लवाटे, सत्वशिला कदम, वंदना कांबळे, चित्रा झिरपे, रेखा क्षिरसागर, वैशाली यादव यांचेसह शेकडो आशा सेविका सहभागी झाल्या होत्या.