Your Own Digital Platform

कोयना प्रकल्पातील बाधित खातेदारांची महाबळेश्वर तालुक्यातील २६ गावांची प्रारूप केलेली संकलन यादी प्रसिध्द


स्थैर्य, सातारा : कोयना प्रकल्पातील बाधित खातेदारांची महाबळेश्वर तालुक्यातील गोगवे, रामेघर, दूधगांव, कळमगांव, देवळी, झाझवंड, चतुरबेट, गारोशी, वेंगळे, वानवली तर्फे सोळशी, खांबील चोरगे, रूळे, गाढवली, आवळण, गावडोशी, वाळणे, रेणोशी, अहिर,आराव, मोरणी, खरोशी, दाभे-दाभेघर, दाभे-दाभेमोहन, शिरणार, म्हाळुंगे, शिंदी अशा एकूण २६ गावांची प्रारूप केलेली संकलन यादी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांच्या वेबसाईटवर तसेच सोलापूर, रायगड, ठाणे, सांगली जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी पुनर्वसन तसेच तहसिल कार्यालय महाबळेश्वर, उपविभागीय अधिकारी वाई, उपविभाग वाई व संबधित गावाच्या तलाठी कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित प्रकल्पग्रस्त खातेदारांनी संकलन यादीतील तपशिलाबाबत काही अडी-अडचणी अगर हरकती असल्यास त्या सात दिवसात तहसिल कार्यालय महाबळेश्वर यांचे कार्यालयांत सादर कराव्यात. या प्रारूप केलेल्या संकलनाबाबत मुदतीत हरकती न प्राप्त झाल्यास त्या परिस्थितीत प्रसिद्ध करण्यात आलेले प्रारूप संकलन अंतिम करणेत येईल, असे सातारा उपजिल्हाधिकारी पुनर्वसन समिक्षा चंद्राकर यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.