Your Own Digital Platform

भावी पिढी सदृढ असणे काळाची गरज- सौ. वेदांतिकाराजे


मोफत  हृदयरोग तपासणी शिबीरास उस्फुर्त  प्रतिसाद; ९० रुग्णांची तपासणी

स्थैर्य, सातारा : आजच्या तंत्रज्ञानाच्या आणि धावत्या युगात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व आहे. शिक्षणाबरोबरच पालकांनी मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. मुले मनाने आणि शरिराने तंदरुस्त असतील तरच ती यशाचे शिखर गाठणार आहेत. त्यामुळे आपल्या देशाची भावी पिढी सुदृढ असणे काळाची गरज असून पालकांनी आपल्या पाल्यांच्या आरोग्यासाठी सजग असणे आवश्यक आहे, असे मत कर्तव्य सोशल ग्रुप  संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी व्यक्त केले.

कर्तव्य सोशल ग्रुप  आणि फॅबियानी  व बुधराणी हार्ट इन्स्टिट्यूत पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २६ जानेवारी रोजी साईअमृत हॉस्पिटल आणि आर्यांग्ल हॉस्पिटल येथे मोफत  बाल ह्रदयरोग निवारण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या उदघाटनप्रसंगी सौ. वेदांतिकाराजे बोलत होत्या. शिबीरात सहभागी ९० मुलांच्या ह्रदयाची टुडी इको (सोनोग्रफी ) तपासणी मोफत  करण्यात आली. तसेच तपासणीअंती आवश्यकता असलेल्या ३५ रुग्णांना पुढील उपचारांसाठी पुणे येथे पाठवण्यात आले.
 
या शिबीरात १ ते १८ वयोगटातील मुलांची ह्रदय तपासणी प्रसिध्द ह्रदयरोग तज्ञ डॉ. रोहित दिक्षित आणि डॉ. सिध्दाथर्अ गडगे यांच्यामार्ङ्गत करण्यात आली. तसेच या तज्ञांनी ह्रदयरोग म्हणजे काय आणि ह्रदयरोग टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. बाळ निळसर पडणे, बाळाचे वजन न वाढणे, जोराजोरात श्‍वास घेणे, लहान बाळ दूध व्यवस्थिन न पिणे व दुध पिताना कपाळावर घाम येणे, धाप लागणे, वारंवार निमोनिया होणे किंवा एएसडी, व्हीएसडी, पीडीए यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास अशा बालकांची तपासणी करणे आवश्यक असते. उपचारांमुळे जन्मत: ह्रदयास असलेले छिद्र ओपनहार्ट शस्त्रकि‘या न करता डिवाईस तंत्राद्वारे (छत्री) बंद केले जाते. रक्त वायाजात नाही, चिरफाड व टाके होत नाहीत, अशा आधुनिक पध्दतीने उपचार केले जातात, असे डॉक्टरांनी यावेळी सांगितले.
 
शिबीरात साईअमृत हॉस्पिटलच्या श्रीमती देसाई, बुधराणीचे अमोल सानटक्के यांच्यासह आर्यांग्ल हॉस्पिलटच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी मोलाचे सहकार्य केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी कर्तव्य सोशल ग्रुपच्या विजय देशमुख, महेश यादव, दिलावर शेख, चंदन घोडके, संदीप भणगे, जितेंद्र मोहिते, विलास कासार, दिपक भोसले, राजू महाडिक, महेंद्र गार्डे, सुनिल भोसले, सतीश जाधव आदींनी परिश्रम घेतले.