Your Own Digital Platform

दिल्ली विधानसभेची निवडणूक जाहीर; ८ फेब्रुवारी रोजी मतदानदिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. दिल्ली विधानसभेसाठी ८ फेब्रुवारीला मतदान होणार असून मतमोजणी या ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे. आजपासूनच निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. एकाच टप्पात निवडणूक होणार असून या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

२२ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेची मुदत संपणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाने पूर्ण तयारी केली असल्याची माहिती त्यांनी दिली. निवडणुकीत १३७५० पोलिंग बूथवर जवळपास १.४६ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. विधानसभा निवडणुकीची अधिसूचना १४ जानेवारी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर निवडणूक अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. निवडणूक अर्ज २१ जानेवारीपर्यंत दाखल करता येणार आहे. तर, ८ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ११ फेब्रुवारी मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी दिली.

पाच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने जबरदस्त यश मिळवत ७० पैकी ६७ जागांवर विजय मिळवला. भाजपला तीन जागांवर यश मिळाले तर काँग्रेसला खातंही उघडता आले नव्हते. राज्यात सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्षाचे सरकार वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिले. नायब राज्यपालांशी निर्णय घेण्यावरून वाद झाले होते. तर, केंद्र सरकार कामात अडथळा आणत असल्याचा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अनेकदा केला होता. दिल्लीतील जनतेची विकासाखाली फसवणूक झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. तर, राज्यात शिक्षण, आरोग्य क्षेत्रात प्रचंड सुधारणा झाली असल्याचा दावा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता. यंदाच्या निवडणुकीत 'आप'ला भाजपचे आव्हान असणार असून काँग्रेस आपली कामगिरी सुधारण्याचे प्रयत्न करणार आहे.
 
70 सदस्यीय दिल्ली विधानसभेची मुदत 22 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. त्याआधी नवीन विधानसभा अस्तित्वात येणं अपेक्षित आहे.

दिल्ली विधानसभेत सध्या 62 जागा आम आदमी पार्टीकडे, 4 जागा भाजपकडे तर 3 जागा अपक्षांकडे आहेत. दिल्लीत CBSE अंतर्गत येणाऱ्या शाळांची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून आहे, त्यामुळे या निवडणुका त्यापूर्वीच होण्याची शक्यता आहे.
 
केजरीवाल यांच्यासमोर आव्हान 
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमोर सत्ता कायम ठेवण्याचं आव्हान आहे. गेल्या पाच वर्षांत केलेली कामं घेऊन ते मतदारांसमोर येत आहे. आपच्या आधी 15 वर्षं दिल्लीत काँग्रेसची सत्ता होती.

भाजपला इथे गेल्या 21 वर्षांपासून सत्ता मिळालेली नाही. त्यामुळे भाजप संपूर्ण ताकदीनिशी उतरण्याची शक्यता आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात झालेली निदर्शनं, जामिया मिलिया इस्लामिया आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठांमध्ये झालेल्या हिंसाचारांमुळे गेल्या काही दिवसात दिल्लीतलं वातावरण ढवळून निघालं आहे.