आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क

इराण: युक्रेनच्या विमानाला अपघात; विमानात १८० प्रवासी


स्थैर्य, तेहरान: इराणची राजधानी तेहरानमध्ये युक्रेनचे विमान कोसळले आहे. तेहरान विमानतळाजवळ कोसळलेल्या विमानात १८० प्रवासी असल्याची माहिती स्थानिक वृत्तसंस्थांनी दिली आहे.

युक्रेन एअरलाइन्सचे बोईंग ७३७ या विमानाने तेहरान विमानतळावरून उड्डाण घेतले. अवघ्या काही वेळेतच विमान कोसळले. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती स्थानिक वृत्तसंस्थांनी दिली आहे. अपघातग्रस्त विमान हे युक्रेनची राजधानी कीव येथे जात होते. विमानात १८० प्रवासी आणि क्रू होता.