Your Own Digital Platform

दुकानदाराच्या फसवणूक प्रकरणी एक जणा विरोधात गुन्हा दाखलस्थैर्यऔंध : मायणी येथील  स्टील साहित्य दुकानदार व काँन्टक्टरची  सुमारे सव्वा लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी एक जणा विरोधात औंध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत औंध पोलिस स्टेशनमधून मिळालेली अधिक माहिती अशी मायणी येथील ओंकारेश्वर ट्रेडर्स या स्टील साहित्य व बिल्डिंग मटेरियल विक्री करणार्या दुकानदारास आपण काँन्टँक्टर असून आपले नाव चंदन आहे असे सांगून आपणास वेगवेगळ्या एम एम च्या जाडीची सुमारे साडे तीन हजार किलो सळई हवी आहे अशी आँर्डर भ्रमणध्वनी वरुन देऊन  दुकान मालक किशोर माळी यांना औंधनजीकच्या त्रिमली गावात हे स्टील पोहचविण्यास चंदन यांनी  त्यांना सांगितले त्याप्रमाणे ट्रक्टरमधून मधून सुमारे एक लाख 52हजार 603रुपये किंमतीचे साहित्य माळी यांनी पाठवून दिले.त्यानंतर ते सर्व साहित्य त्रिमली येथे पोहच करण्यास चंदन यांनी सांगितले त्याप्रमाणे ते सर्व साहित्य काम चालू असलेल्या ठिकाणी पोहच केले असता व साहित्याचे बील  त्याठिकाणी  मागितले असता त्याठिकाणी उपस्थित असणारे काँन्टँक्टर सुधाकर भंडारे यांनी आपण या कामाचे काँन्टँक्टर असून चंदन खरात यांना या साहित्याचे एक लाख पंचवीस हजार रूपये दिले असल्याचे सांगितले त्यानंतर माळी यांचे बंधू रोहित यांनी या घटनेची सविस्तर माहिती किशोर माळी यांना दिल्यानंतर चंदन खरात यांनी हा माल आपला असल्याचे सांगून माळी यांची फसवणूक  केल्याचे  व त्याठिकाणाहुन
 पैसे घेतल्याचे लक्षात आल्यानंतर किशोर माळी यांनी चंदन खरात याच्या विरोधात फसवणुकीची फिर्याद औंध पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.