Your Own Digital Platform

शाहूपुरी मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्लॅग दाखवून शुभारंभ करताना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व संजय राऊत, विशाल वायकर व मान्यवर.

सातारा, : सातारा शहरच नव्हे तर आता जिल्हा मॅरेथॉनची पंढरी झाला आहे. सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धा सातासमुद्रापलीकडे गेली असून जिल्ह्यातील प्रत्येकजण धावण्याच्या जिद्दीने प्रेरीत झाला आहे. आता तालुकानिहाय मॅरेथॉन स्पर्धा होत असून सातारा शहरातील उपनगर असलेल्या शाहूपुरीत गेल्या दोन वर्षांपासून शाहूपरी प्राईड मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा दमाखात झाली. हजारो अबालवृध्दांनी यामध्ये सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संयोजकांनी ही स्पर्धा यशस्वी करण्याचे आव्हान पेलत उत्कृष्ट नियोजन केले.

10 कि.मी. अंतर व 3 कि. मी. अंतर अशा दोन प्रकारात आणि विविध वयोगटात शाहूपुरी प्राईड रन रंगली. आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते प्लॅग दाखवून स्पर्धेस प्रारंभ झाला. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, शाहूपुरीचे उपसरपंच, राजेंद्र गिरीगोसावी सदस्य राजेंद्रकुमार मोहिते, तसेच मॅरेथॉनचे प्रेरक डॉ. संदीप काटे, डॉ. चंद्रशेखर घोरपडे, संदीप शिंदे, शाम छाबडा व मान्यवर उपस्थित होते.
 
बी कॉन प्रस्तुत शाहूपुरी प्राईड रन 2020 ला सहप्रायोजक म्हणून एस. के. पवार स्मृती प्रतिष्ठान, श्रीनाथ प्लायवूड, डी. एन. छाबडा शिक्षण संस्था, पॉकेट कॅफे, सुवर्णस्पर्श ज्वेलर्स, ओम ग्लास, पालेकर बेकरी, माय जल, शिवशक्ती ट्रेडिंग, एसएमएस फार्मा, सुनील शिंदे अ‍ॅड असोसिएट, एस. के. वाय. एक्सप्रेस, व्ही. टीच इंडस्ट्रिज, डी. एम. कंस्ट्रक्शनचे सहकार्य लाभले. मेडिकल पार्टनर म्हणून दिवेकर हॉस्पिटल यांनी सहकार्य केले.

या स्पर्धेत नामांकित मॅरेथॉनपट्टूंसह हजारो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये 10 कि.मी. अंतर स्पर्धेतील वयोगटानुसार निकाल पुढीलप्रमाणे; वयोगट 15 ते 30 : पुरुषगटात प्रथम क्रमांक शिवम कापले (37.04 मिनिट), द्वितीय क्रमांक ऋषी धनावडे (37.27 मिनिट), तिसरा क्रमांक सलमान शेख (40.01 मिनिट) यांनी यश मिळवले. 15 ते 30 वयोगट महिलांमध्ये अनुष्का घाटे (53.48 मिनिट) हिने प्रथम क्रमांक तर आकांक्षा मोरे (1 तास 5 मिनिट) हिने दुसरा क्रमांक आणि रुपाली बाबर (1 तास 10 मिनिट) हिने तृतीय क्रमांक मिळवला.
 
वयोगट 31 ते 40 पुरुषमध्ये प्रथम क्रमांक, विनित जाधव (49 मिनिट) द्वितीय क्रमांक, संदीप चव्हाण (49.14 मिनिट) तर रविवराज बाबर (49.51 मिनिट) याने तिसरा क्रमांक मिळवला. 31 ते 40 महिला गटात स्मिता शिंदे (54.08 मिनिट) यांनी प्रथम तर शैलजा पाटणकर (54.21 मिनिट) यांनी द्वितीय क्रमांक आणि धनश्री भिलारे (1 तास 1 मिनिट) यांनी तिसरा क्रमांक मिळवला. 41 ते 50 पुरुष गटात प्रथम क्रमांक रवींद्र जगदाळे (40.49 मिनिट) द्वितीय क्रमांक वसंत लकडे (45.58 मिनिट) तर डॉ. संदीप काटे (46.31 मिनिट) तिसरा क्रमांक मिळवला.

41 ते 50 महिला गटात प्रथम क्रमांक अपर्णा कुचेकर (1 तास 13 मिनिट) द्वितीय क्रमांक डॉ. अदिती घोरपडे (1 तास 8 मिनिट) तर रश्मी चव्हाण (1 तास 19 मिनिट) यांनी तिसरा क्रमां मिळवला.

सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाहूपुरी प्राईड रन टीमचे रेस डायरेक्टर संतोष जाधव, कोऑर्डिनेटर अनिकेत जगताप, प्रेसिडेंट प्रसाद सुतार व व्हाईस प्रेसिडेंट यश शिंदे, संतोष महामुलकर, अनुराधा गोलीपकर, यशवंत गायकवाड, सचिन शिंदे, मुकुंद पवार, रुपेश राजाराम शिंदे, महेश गोंजारी, सेक्रेटरी नितीराज साळुंखे, खजिनदार विकास चव्हाण यांनी परिश्रम घेतले तर धावदूत म्हणून प्रसाद पाटील, महादेव लेंभे, रमा कदम यांनी काम पाहिले.